महिलेने ऑर्डर केलं बर्गर तर दुकानदाराने पाठवलं फक्त केचअप, कारण वाचून पोट धरून हसाल

एका महिलेने खाण्यासाठी बर्गर ऑर्डर केला. पण तिला घरी जे आलं त्यानंतर सगळ्यांनाच आर्श्चर्याचा धक्का बसला.

महिलेने ऑर्डर केलं बर्गर तर दुकानदाराने पाठवलं फक्त केचअप, कारण वाचून पोट धरून हसाल

नवी दिल्ली : जगभरात असे अनेक प्रकार समोर येतात ज्यामुळे थक्क व्हायला होतं. असाच एक मजेदार आणि आश्चर्यकारक ऑनलाइन ऑर्डर (Online Order) केल्यानंतर समोर आला आहे. तुम्ही ऑर्डर काही वेगळं करता आणि तुमच्या घरी काही वेगळंच येतं अशा असंख्य तक्रारी तुम्ही पाहिल्याच असतील. इथंही एका महिलेने खाण्यासाठी बर्गर ऑर्डर केला. पण तिला घरी जे आलं त्यानंतर सगळ्यांनाच आर्श्चर्याचा धक्का बसला. (viral news woman order burger but she got only ketchup canada news)

ही घटना कॅनडाची आहे. इथं एका महिलेने ऑनलाइन हॅमबर्गर ऑर्डर केलं. पण दुकानदारानं मात्र, तिला फक्त केचअपचे पॅकेट घरी पाठवले. आता तुम्ही म्हणाल, दुकानदार विसरला असेल पण याचं कारणंही तसं खास आणि मेजेदार आहे.

हा किस्सा इतका गमतीचा आहे की महिलेने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बिलाचा फोटोही शेअर केला जो आज तुफान व्हायरल होत आहे. हॅमबर्गर ऑर्डर केलं पण हाती फक्त केचअप आल्याने दोघेही शॉक झाले आणि नंतर बिल पाहिल्यावर सगळा किस्सा त्यांच्या लक्षात आला.


ते झालं असं की, आपण एखादी ऑर्डर देताना आपल्या आवडीच्या पदार्थ जास्त घाला किंवा नको ते कमी घाला अशा सूचना देत असतो. तसंच या महिलेनंही तिला नको असणारे पदार्थ बर्गरमध्ये न टाकण्यास सांगितलं. पण यामध्ये तिने चक्क ‘नो बन, नो पॅटी, नो ओनियन’ असं सांगितलं.

आता तुम्हीच सांगा बन आणि पॅटी घेतलीच नाही तर बर्गर तरी कसा बनणार. त्यामुळे दुकानदारानेही ग्राहकाने ऑर्डर दिल्याप्रमाणे तिला फक्त केचअप पाठवलं. या जोडप्यासोबत घडलेला हा प्रकार सध्या सोशल मीडियावर चांगला व्हायरल होत आहे.

(viral news woman order burger but she got only ketchup canada news)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *