AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Donald Trump : मोठी बातमी! व्हाईट हाऊसनेच ट्रम्प यांचा खरा चेहरा उघडा पाडला, त्या व्यक्तीच्या प्रतिक्रियेने खळबळ!

आपल्याला नोबेल पुरस्कार मिळाला पाहिजे, असे डोनाल्ड ट्रम्प सतत सांगत होते. प्रत्यक्ष मात्र या पुरस्काराने त्यांना हुलकावणी दिली. त्यानंतर आता व्हाईट हाऊसच्या प्रतिनिधीने एक संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

Donald Trump : मोठी बातमी! व्हाईट हाऊसनेच ट्रम्प यांचा खरा चेहरा उघडा पाडला, त्या व्यक्तीच्या प्रतिक्रियेने खळबळ!
donald trump
| Updated on: Oct 11, 2025 | 8:13 PM
Share

Donald Trump On Nobel Prize : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गेल्या अनेक दिवसांपासून शांततेचा नोबेल मिळावा यासाठी प्रयत्नरत होते. मात्र त्यांना या पुरस्काराने हुलकावणी दिली. हा पुरस्कार मरिया कोरिना यांना मिळाला आहे. मला नोबेल पुरस्कार द्या, असे मी कधीही म्हणालेलो नाही, असे स्पष्टीकरण ट्रम्प यांनी दिले आहे. त्यांनी मला नोबेल नको होता, असे विधान केलेले असले तरी व्हाईट हाऊसने मात्र रागराग केला आहे. आता व्हाईट हाऊसचे कम्युनिकेशन्स डायरेक्टर स्टीवन चेउंग यांनी एक जळजळीत प्रतिक्रि या दिली आहे. त्यांनी नोबेल पुरस्कार निवड समितीवर टीका केली आहे.

मला नोबेल नकोच होता, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंत 10 वेळा मला नोबेल पुरस्कार मिळायला हवा, असे विधान केलेले होते. आता मात्र मला नोबेल नकोय, असे ते सांगत आहेत. मी आतापर्यंत अनेक देशांमधील युद्ध थांबवले आहे. मी लाखो लोकांचे प्राण वाचवले आहेत. या युद्धांमध्ये भारत-पाकिस्तानच्या युद्धाचाही समावेश आहे. त्यामुळेच मला नोबेल मिळायला हवा, असा दावा ट्रम्प यांच्याकडून केला जात आता व्हाईट हाऊसचे कम्युनिकेशन्स डायरेक्टर स्टीवन चेउंग यांनी या पुरस्कारावर प्रतिक्रिया दिली आहे. नोबेल पुरस्कार निवड समितीने ट्रम्प यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष केले आहे, असा आरोप स्टीवन चेउंग यांनी केला आहे.

नोबेल समितीवर केली टीका

“आम्हाला शांतीपेक्षा राजकारण फार महत्त्वाचे आहे, हे नोबेल समितीने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. तरीदेखील डोनाल्ड ट्रम्प हे शांती करार घडवून आणणे, युद्ध थांबवणे तसेच लोकांचा जीव वाचवण्याचे काम अविरतपणे करत राहतील. ट्रम्प यांचे हृदय मानवतावादी आहे,” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

ट्रम्प यांनी केले पुतीन यांचे कौतुक

नोबेल पुरस्काराने हुलकावणी घातल्यानंतर ट्रम्प यांनी एक सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे आभार मनले होते. नोबेल पुरस्कार मिळाला नसला तरी पुतीन यांनी ट्रम्प यांचे कौतुक केले होते. त्यानंतर अध्यक्ष पुतीन यांना धन्यवाद, असे ट्रम्प म्हणाले होते. स्टीवन चेउंग यांनी नोबेल पुरस्काराबद्दल केलेल्या पोस्टनंतर ट्रम्प यांनी पुतीन यांचे आभार मानले होते.

दरम्यान, मला नोबेल नको होता, असे ट्रम्प सतत सांगत असले तरी आता व्हाईट हाऊसच्या प्रतिनिधीनेच नोबेल समितीवर जाहीर नाराजी व्यक्त केल्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. ट्रम्प यांना नोबेल विसरता येत नाहीये का? अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.