AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बांग्लादेशाचे दोन तुकडे होणार ? मान्यमारमध्ये कोणता भयानक कट शिजत आहे

बांग्लादेशातील सत्तांतर झाल्यानंतर मोहम्मद युनुस यांचे अंतरिम सरकार अस्तित्वात आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये सार्वजनिक निवडणूका झाल्यानंतर येथे नवीन सरकार येणार आहे. त्याआधीच बांग्लादेशावर नवीन संकट आले आहे.

बांग्लादेशाचे दोन तुकडे होणार ? मान्यमारमध्ये कोणता भयानक कट शिजत आहे
rakhine state
| Updated on: Oct 06, 2025 | 3:17 PM
Share

आपल्या शेजारील बांग्लादेशात सत्तापालट झाल्यानंतरही सरकार स्थिर झालेले नाही. आता तेथे नवीनच संकट निर्माण होत आहे. आता बांग्लादेशा संदर्भात अराकन आर्मीचा खतरनाक प्लान उघडकीस आला आहे. अराकन आर्मीचे जवान आता रखाईनला  ( राखीन ) स्वतंत्र देश बनवण्याची आणि बांग्लादेशाचे दोन तुकडे करण्याच्या सीक्रेट मिशनवर काम करत आहेत. अराकन आर्मी बांग्लादेश आणि म्यानमारच्या बॉर्डरवर सक्रीय आहे. येथे अराकन आर्मीची लढाई जुंटा सैन्याशी सुरु आहे.

रखाईनच्या अराकन आर्मीचे जवान सुप्तपद्धतीने बांग्लादेश तोडण्याच्या योजनेवर काम करत आहेत. यासाठी आदिवासी तरुणांना प्रशिक्षण दिले जात आहे. अराकम आर्मीकडे ४५,००० तरुण आहेत. त्यांचा प्रयत्न बांग्लादेश आणि म्यानमार यांचा काही भाग तोडून स्वतंत्र देश बनवण्याचा आहे.

बांग्लादेशातील स्थानिक वृत्तपत्र नया दिगांताच्या बातमीनूसार अराकनचे सैन्य बांग्लादेशाला तोडण्याच्या प्लानवर काम करत आहे. या योजनेंतर्गत पर्वतीय क्षेत्रातील आदिवासींना शस्रास्रे चालवण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणा दरम्यान आदिवासींना स्वतंत्र राष्ट्राच्या मागणीसाठी त्यांचे ब्रेन वॉश केले जात आहे. १९७१ मध्ये पाकिस्तानपासून तोडून बांग्लादेशाची स्थापना झाली होती.

रखाइन (राखीन )राज्याची संकल्पना काय आहे?

रखाईन ( राखीन ) हे म्यानमारचे एक राज्य असून हा बौद्ध बहुल प्रांत आहे. येथे अनेक काळापासून अराकन आर्मी वेगळ्या प्रांतासाठी संघर्ष करीत आहे. साल २०१७ मध्ये येथे अराकान आर्मी आणि रोहिंग्या यांच्या दरम्यान मोठी चकमक झाली होती. त्यानंतर सुमारे ७ लाख रोहिंग्यांना घर सोडावे लागले होते.

अराकान आर्मीची मागणी स्वतंत्र रखाईन प्रांत बनवण्याची आहे. याचा नकाशा काहीसा अशा प्रकारचा आहे.- म्यानमारच्या रखाईन राज्यासह बांग्लादेशाचा दक्षिण पूर्वेचा भाग आहे. रखाईनचा हा प्लान जर यशस्वी झाला तर बांग्लादेशाचे बंदरबन आणि कॉक्स बाजाराचा हिस्सा ढाकाच्या हातातून निसटून जाऊ शकतो.

अराकान आर्मीची काय आहे तयारी?

नया दिगांता वृत्तपत्राच्या बातमीनुसार अराकान आर्मी जवळ सध्या ४५ हजाराचे सैन्य आहे. संघटनेचा पहिला प्रयत्न या संख्येला वाढवण्याचा आहा. यासाठी लागोपाठ प्रशिक्षण कँप लावले जात आहेत. संघटनेचा विस्तार बांग्लादेशात देखील केला जात आहे. ही संघटना मुसलमानांची भिती दाखवून स्थानिक आदिवासी जमातीला एकत्र करत आहे.

या वृत्तपत्राच्या बातमीनुसार सध्या अराकान आर्मीच्या ताब्यात म्यानमारची सुमारे २७१ किमी जमीन आहे. अराकान आर्मीचे जवान आपली संघटना मजबूत करण्यासाठी बांग्लादेशातील बॉर्डरवरून पैसे कमावण्यासाठी ड्रग्ज आणि तस्करीचा धंदाही करत आहे.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....