नवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज

पती खूप जास्त प्रेम करतो, म्हणून कंटाळून यूएईच्या एका महिलेने घटस्फोट मागितला आहे. फुजैराच्या शरिया न्यायालयात घटस्फोटाचा हा विचित्र अर्ज दाखल करण्यात आला आहे.

नवरा कधीही भांडत नाही, पतीच्या प्रेमाला कंटाळून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज

अबू धाबी (युएई) : नवरा प्रेम करत नाही, पती-पत्नीत नेहमी भांडणं होत असतात, पती भेटवस्तू देत नाही, अशा अनेक कारणांवरुन घटस्फोट होत असतात. मात्र, याउलट नवरा अतीप्रेम करतो म्हणून एका महिलेने घटस्फोट मागितला आहे. या महिलेच्या पतीविरोधातील तक्रारी ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटलं.

पती खूप जास्त प्रेम करतो, म्हणून कंटाळून यूएईच्या एका महिलेने घटस्फोट मागितला आहे. फुजैराच्या शरिया न्यायालयात घटस्फोटाचा हा विचित्र अर्ज दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या जोडप्याच्या लग्नाला फक्त एक वर्ष झालं आहे.

खलीज टाइम्सच्या रिपोर्टनुसार, महिलेला तिच्या पतीचं प्रेम असहनिय होत आहे. त्यामुळे अखेर तिने घटस्फोटाचा निर्णय घेतला. ”ते माझ्यावर कधीही ओरडत नाही, मला कधीही दु:खी होऊ देत नाही. ते घरातील कामांमध्येही माझी मदत करतात, कधीकधी ते माझ्यासाठी जेवणही बनवतात, एक वर्षाच्या संसारात आमचं एकदाही भांडण झालेलं नाही. मी इतकं प्रेम आणि आपुलकीने त्रस्त झाली आहे”, असं महिलेने न्यायालयात सांगितलं.

वृत्तानुसार, या महिलेच्या पतीने तिच्यावर इतकं प्रेम केलं की तिचं आयुष्य हे नरकाहून कठीण होऊन बसलं. “मला माझ्या पतीसोबत भांडायचं आहे. मी त्यांच्यासोबत एकदा तरी भांडण्याची वाट पाहत आहे. पण माझ्या पतीसोबत ते शक्य नाही. कारण ते नेहमी माझ्या चुका माफ करतात, मला अनेक भेटवस्तू देतात. पण, मला त्यांच्यासोबत भांडायचं आहे. मला कुठलीही समस्या नसलेलं जीवन नको आहे”, अशी तक्रार या महिलेने केली.

महिलेच्या पतीनुसार, त्याने काहीही चुकीचं केलेलं नाही. तो केवळ एक आदर्श आणि परफेक्ट पती होण्याचा प्रयत्न करत होता. महिलेच्या पतीने पत्नीला घटस्फोटाचा अर्ज परत घेण्याचे आदेश देण्यात यावे यासाठी न्यायालयाकडे विनंती केली आहे.

“एका वर्षात लग्नावर निर्णय देणे चुकीचं आहे. प्रत्येकजण आपल्या चुकांपासून शिकत असतो”, असं पतीने न्यायालयात सांगितलं.

तर न्यायालयाने या पती-पत्नीला त्यांच्यातील मतभेद सोडवण्यास सांगितलं आहे.

संबंधित बातम्या :

नवरा आंघोळ, दाढी करत नसल्याने घटस्फोटासाठी अर्ज

पबजी गेम खेळण्यापासून रोखले म्हणून पत्नीने घटस्फोट मागितला

पबजी पार्टनरसाठी लाईफ पार्टनरसोबत घटस्फोट

रशियन ब्युटी क्वीनसोबत लग्नासाठी राजघराणं सोडलं, वर्षभरातच घटस्फोट

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *