कारमध्ये गर्लफ्रेंडला किस केलं, पण पोलिसांनी पाहिलं तर काय होणार? नियम काय सांगतो!
अनेकदा लोकांना वाटतं की कार ही त्यांची खाजगी जागा आहे, त्यामुळे त्यात ते काहीही करू शकतात. पण खरच तुम्ही तुमच्या कारमध्ये असे काही करु शकता का? जाणून घ्या...

आजकालचे तरुण अनेकदा गर्लफ्रेंडसोबत अनेक ठिकाणी फिरत असतात. एकत्र फिरताना एकमेकांसोबत वेळ घालवतात ते एकमेकांना ओळखण्याचा प्रयत्न करतात. मात्र, अनेकदा ते त्यांच्या खाजगीपणाकडे दुर्लक्ष करतात. कुठेतरी पार्किंग लॉट किंवा निर्जन जागी कारमध्ये बसून एकमेकांसोबत जवळचा वेळ घालवतात. अनेकदा लोकांना वाटतं की कार ही खाजगी जागा आहे, त्यामुळे त्यात ते काहीही करू शकतात. पण हे पूर्णपणे कायदेशीर आहे का की पोलिस यात कारवाई करू शकतात? तर चला जाणून घेऊया की कारमध्ये गर्लफ्रेंडला किस करत असाल तर पोलिस पकडू शकतात का आणि काय आहेत नियम.
पब्लिक प्लेसवर जोडप्यांचे अधिकार
जर तुम्ही तुमच्या पार्टनरचा हात धरून चालत असाल, हग करत असाल किंवा फक्त बसून गप्पा मारत असाल तर हे पूर्णपणे कायदेशीर आहे. अशा प्रकरणांमध्ये पोलिस तुम्हाला त्रास देऊ शकत नाहीत. कारण तुम्ही कोणतीही अश्लील कृती करत नाही आहात. जोपर्यंत तुम्ही कोणतीही अश्लील कृती (Obscene Act) करत नाही, तोपर्यंत कोणताही पोलिस तुम्हाला पकडू शकत नाही. पण जर एखादे जोडपे अश्लील कृती करत असेल, तर पोलिस कारवाई करू शकतात. यात तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद आहे. कायद्याने पब्लिक प्लेसवर अश्लील कृती केल्यास तुम्हाला तुरुंगवास होऊ शकतो. अशा प्रकरणांमध्ये पोलिस थेट कारवाई करू शकतात आणि कोर्टात हजर करू शकतात.
कारमध्ये गर्लफ्रेंडला किस करत असाल तर पोलिस पकडू शकतात का?
अनेकदा जोडपी विचार करतात की त्यांची कार मॉल किंवा पार्किंग लॉटमध्ये उभी आहे तर त्यात बसून ते किस करू शकतात. कायद्याच्या दृष्टीने हे चुकीचे आहे. भारतात पब्लिक प्लेसमध्ये अश्लील कृती करणे बेकायदेशीर आहे. जर तुमची कार पब्लिक प्लेसवर उभी असेल तर त्यात बसून किस करणे अश्लील कृती मानली जाऊ शकते. अशा परिस्थितीत पोलिस तुम्हाला थांबवू शकतात, चौकशी करू शकतात आणि गरज पडल्यास ताब्यातही घेऊ शकतात. हा नियम पती-पत्नी आणि गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड दोघांनाही लागू होतो.
पोलिस कधी थांबवू शकतात?
1. पब्लिक न्यूसेंस – जर तुमच्या कृतींमुळे पब्लिक प्लेसवर त्रास होत असेल.
2. तक्रारीवर – जर तुमच्या पार्टनरने किंवा कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीने पोलिसांकडे तक्रार केली असेल.
3. आदेश न मानल्यास – जर पोलिस तुम्हाला थांबवतात आणि तुम्ही त्यांचा विरोध करत असाल किंवा वाद घालत असाल.
