गुजरातचे चारवेळा मुख्यमंत्री ते जगातील लोकप्रिय नेत्यांच्या यादीत मानाचे स्थान; वाचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रवास…

सोशल मीडियाच्या विचार केला तर ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फाॅलोवर्सची संख्या जबरदस्त आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना 133.1 दशलक्ष लोक फाॅलो करतात.

गुजरातचे चारवेळा मुख्यमंत्री ते जगातील लोकप्रिय नेत्यांच्या यादीत मानाचे स्थान; वाचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रवास...
Follow us
| Updated on: Sep 17, 2022 | 2:06 PM

मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांना जगातील सर्वात लोकप्रिय नेत्यांच्या यादीत पहिले स्थान मिळाले आहे. मॉर्निंग कन्सल्टने एक सर्वेक्षण केला होता. यामध्ये 75 टक्के गुणांसह पहिले स्थान मिळवण्याचा मान नरेंद्र मोदी यांना मिळालांय. या सर्वेक्षणामधील (Survey) विशेष बाब म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन थेट 8 व्या क्रमांकावर फेकले गेले होते. जो बायडेन यांना 43 टक्के गुण मिळाले. गेल्या काही वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता सातत्याने वाढत आहे. सोशल मीडियावरही नरेंद्र मोदी यांची फॅन फाॅलोइंग (Fan following) वाढली आहे. जगातील महत्वाच्या नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव सर्वात अगोदर घेतले जाते. जगभरात नरेंद्र मोदी यांचे फॉलोअर्स बघायला मिळतात.

जगातील लोकप्रिय नेत्यांच्या यादीत पहिले स्थान

मॉर्निंग कन्सल्टच्या सर्वेक्षणामध्ये नरेंद्र मोदी यांनी पहिले स्थान मिळवले हे फक्त त्यांचे यश नसून संपूर्ण देशाचे यश मानले जातंय. जगातील आघाडीच्या नेत्यांमध्ये पंतप्रधान मोदी आणि भारताच्या लोकप्रियतेचा आलेख सातत्याने वाढतोय, ही प्रत्येक भारतीयांसाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. 17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरातमधील वडनगर येथे नरेंद्र मोदी यांच्या जन्म झालाय. आज नरेंद्र मोदी त्यांचा 72 वा वाढदिवस साजरा करत आहेत.

ट्विटरवर नरेंद्र मोदी यांच्या फाॅलोवर्स संख्येत मोठी वाढ

सोशल मीडियाच्या विचार केला तर ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फॉलोअर्सची संख्या जबरदस्त आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना 133.1 दशलक्ष लोक फाॅलो करतात. जगातील नेतेमंडळींमध्ये सर्वात जास्त लोक बराक ओबामा यांना फाॅलो करतात. तर बराक ओबामानंतर जगभरात ट्विटरवर नरेंद्र मोदींना लोक फाॅलो करत असून यामध्ये नरेंद्र मोदी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता जेवढी जास्त आहे, त्यापेक्षाही मोठा त्यांचा संघर्ष बघायला मिळतो.

हे सुद्धा वाचा

गुजराचे मुख्यमंत्री होण्याचा चार वेळा मिळाला बहुमान

एक चहा विकणारा सर्वसामान्य माणूस एका बलाढ्य देशाचा पंतप्रधान होतो, विचार करा त्या व्यक्तीचा संघर्ष किती जास्त मोठा असेल. नरेंद्र मोदी यांनी वयाच्या 8 व्या वर्षी RSS मध्ये प्रवेश केला. पदवीनंतर घर सोडले, धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. 1970 मध्ये ते गुजरातमध्ये परतले आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ नेते बनले. भाजपचे दिग्गज नेते अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्या रथयात्रेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. नरेंद्र मोदी यांचे 1998 मध्‍ये प्रमोशन करून राष्‍ट्रीय सरचिटणीस (संघटन) पद दिले. नरेंद्र मोदी यांना सलग 4 वेळा गुजरातचे मुख्यमंत्री होण्याचा बहुमान मिळाला.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.