Uddhav Thackeray | डोक्यात तिडिक गेली की जिभेवर कोल्हापुरी चपलेचं नाव का येतं? उद्धव ठाकरेंनाही आवरलं नाही….

कोल्हापुरी चपलेचा इतिहास 13 व्या शतकापर्यंत घेऊन जातो. राजे-महाराजांच्या काळात. हस्तकलेचा हा नमूना तेव्हा एक पिढी दुसऱ्या पिढीला हस्तांतरीत करत असे...

Uddhav Thackeray | डोक्यात तिडिक गेली की जिभेवर कोल्हापुरी चपलेचं नाव का येतं? उद्धव ठाकरेंनाही आवरलं नाही....
Image Credit source: tv9 marathi
मंजिरी धर्माधिकारी

|

Aug 03, 2022 | 7:10 PM

मुंबईः ”ये है कोल्हापुरी चप्पल (Kolhapuri CHappal), नंबर नौ, देखने मे नौं और फटके में सौ… ” अमिताभ बच्चनच्या (Amitabh Bacchan) सुहाग चित्रपटातला हा फेमस डायलॉग. अमिताभ बच्चन एका सीनमध्ये पायातली कोल्हापुरी चप्पल काढतो आणि एका गुंडाची पिटाई करतो. ही कोल्हापुरी चप्पल आज आठवण्याचं कारण म्हणजे उद्धव ठाकरेंचं (Uddhav Thackeray) वक्तव्य. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी एक वक्तव्य केलं. गुजराती आणि राजस्थानींविशाय मुंबई आर्थिक राजधानी बनूच शकत नाही.. राज्यपालांच्या या वक्तव्यावरून सर्वच पक्षांनी टीकेची झोड उठवलीय. उद्धव ठाकरे म्हणाले, ‘राज्यपालांनी महाराष्ट्रात सगळं काही पाहिलं. महाराष्ट्र का घी देखा.. मगर कोल्हापुरी चप्पल नही देखा. राज्यपालांना आता कोल्हापुरी जोडे दाखवायची वेळ आली आहे.’ उद्धव ठाकरेच नाही तर संतापलेली कुणीही व्यक्ती महाराष्ट्रात सहजपणे कोल्हापुरी चपलेचा उल्लेख करून जाते. कारण ती जितकी नाजूक आणि सुंदर असते तेवढीच ती एवढी सपकन् लागते की आयुष्यभर आठवण राहते… या कोल्हापुरी चपलेची वैशिष्ट्य पहावीच लागतील…

प्रत्येकाला शोभून दिसते…

सध्याच्या फॅशनच्या काळात कोल्हापुरी चप्पल तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच शोभून दिसते. लहान मुलांच्या पायात तर तिचा रुबाब आणखीच उठून दिसतो. अनेक वर्षांची असूनही आजही तिची फॅशन टिकून आहे. वजनाला हलकी, दिसताना सुंदर पण मजबूत एवढी की भल्या भल्या ब्रँडला मागे टाकेल. कुर्ता पायजामा, जिन्स, पँट, झोती कशावरही ही चप्पल खुलून दिसते. महिलांनाही साडी, ड्रेस असो वा इतर पोशाख कोल्हापुरी चप्पल शोभतेत. या चपलेचा इतिहास जवळपास 700 वर्षांपूर्वीचा आहे.

काय आहे इतिहास?

कोल्हापुर चपलेचा इतिहास 13 व्या शतकापर्यंत जुना आहे. हस्तकलेचा हा सुंदर नमूना एक पिढी दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचवलत असे. तेव्हा राजे-महाराजे ही चप्पल घालत असत. 18 व्या शतकात खऱ्या अर्थाने देवाण-घेवाणीच्या रुपात तिचा व्यापार सुरु झाला. कपाशी, पायताण, बक्कल नाली अशी काही तिची नावं होती. ही चप्पल बनवणाऱ्या कलाकारांच्या नावानं ती नावं पडली होती.

कोल्हापुरचं वैशिष्ट्य काय?

असं सांगतात की, महाराष्ट्रात कोल्हापूरमधील सौदागर कुटुंबानं 1920 मध्ये अत्यंत हलक्या वजनाची सुबक डिझाइनची चप्पल तयार केली. मानवी कानाच्या आकाराची. म्हणून तिला कनवली म्हटलं जाऊ लागलं. सौदागर कुटुंबानं ही चप्पल मुंबईतील प्रसिद्ध जेजे अँड सन्स शूजच्या मालकाला विकली. मागणी वाढत गेली आणि चप्पल लोकप्रिय होत गेली. त्यानंतर कोल्हापुरच्या नावानेच ही चप्पल प्रसिद्ध झाली.

कशी तयार होते?

माध्यमांमधील वृत्तानुसार, ही चप्पल बनवण्यासाठीचा चामडं कोलकाता आणि चेन्नईतून येतं. आता बऱ्याच ठिकाणी ते बनतंय. यासाठी प्राण्यांच्या कातडीचा वापर होतो. नरम होण्यासाठी ही कातडी पाण्यात बुडवून ठेवतात. त्यानंतर डिझाइन आणि मापानुसार ती घडवतात. वॉटरप्रूफ करण्यासाठी ती तेलात भिजवतात. सोल तयार करण्यासाठी चप्पलेच्या टाचेचा आकार कापून तो पुन्हा जोडला जातो. वरील भागा नाजूक नक्षीकाम केलं जातं. कोल्हापुरी चपलांप्रमाणेच बुटही खूप लोकप्रिय आहेत.

विदेशातही मोठी मागणी

कोल्हापुरी चप्पल विदेशातही प्रसिद्ध आहे. 2019 मध्ये जागतिक व्यापार संघटना WTO ने जीआय म्हणजेच तिला जियोग्राफिकल इंडिकेशन टॅग दिलं. हा टॅग मिळाल्यावर अशी चप्पल बनवण्यासाठीचे ठिकाण अधिकृत केले जाते. महाराष्ट्रात कोल्हापूर, सोलापूर, सांगली, साताऱ्यासह कर्नाटकमधील काही जिल्ह्यात ही चप्पल तयार होते. या चपलेची मागणी विदेशातही मोठी आहे. जर्मनी, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, अमेरिकेसह इतर युरोपिय देशांतूनही चप्पलेला ग्राहक आहेत.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें