Vinesh Phogat : अंगात सूट घालताच झटपट वजन कमी होतं, विनेश फोगाटच्या या सूटचे वैशिष्ट्ये काय?
कुस्तीपटू विनेश फोगाट ही ऑलिम्पिकच्या अंतिम सामन्यातून बाद झाली आहे. त्यामुळे तिचं सुवर्ण पदकाचं स्वप्न भंगलं आहे. आज तिची ही बातमी सर्वच वर्तमानपत्रात ठळक अक्षरात छापून आली आहे. पहिल्या पानावर विनेशचा एक फोटो छापून आला आहे. त्यात तिने विशिष्ट प्रकारचा सूट घातल्याचं दिसत आहे. सध्या या सूटचीच जोरदार चर्चा सुरू आहे. अत्यंत असा हा खास सूट आहे.
भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट हिचं सुवर्णपदकाचं स्वप्न भंगलं आहे. ऑलिम्पिक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अपात्र ठरल्याने तिला सामन्यातून बाद करण्यात आलं आहे. त्यामुळे तिला रजत पदक सुद्धा मिळू शकलं नाही. वजन अधिक भरल्याने तिला ऑलिम्पिकच्या सामन्यातून बाद करण्यात आलं आहे. त्यानंतर विनेशने कुस्तीतून संन्यास घेण्याची घोषणा केली आहे. विनेशची ही बातमी आज सर्वत्र छापून आली आहे. तिच्या फोटोसहीत ही बातमी आली आहे. त्यात ती एक ट्रॅक सूट घातलेली दिसत आहे. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड शेअर केला जात आहे. त्याला कारण म्हणजे तिचा ट्रॅक सूट. हा ट्रॅक सूट अंत्यत वेगळा असल्याने त्यावरच अधिक चर्चा रंगली आहे.
ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरण्याच्या एक दिवस आधी विनेश फोगाटचे बाऊट होते. त्या दिवशी तिचं वजन 50 किलोच्या आत होते. पण दिवसभर अनेक बाऊट खेळल्यानंतर तिचं वजन 52 किलोपेक्षा अधिक झालं होतं. तिचीही कॅटेगिरी अधिक होती. त्यामुळे वजन 50 किलोच्या आत आणण्यासाठी तिने जीवाची पराकष्ठा केली. तिने रात्रभर वर्कआऊट केलं होतं. तरीही तिचं वजन 100 ग्रॅम राहिलं होतं. त्यामुळेच तिला खेळण्यास मनाई करण्यात आली.
रात्रभर पाण्याचा थेंबही घेतला नाही
रात्रभर वजन कमी करण्यासाठी तिने बिल्कूल पाणी घेतलं नव्हतं. तिने वर्कआऊट केलं. सायकलिंग केली. आणि वजन कमी करण्याचा प्रयत्न केला. हे वजन कमी करण्यासाठी तिचा सूट अत्यंत महत्त्वाचा होता. त्यामुळेच तिचं वजन कमी झालं होतं.
काय आहे हा सूट ?
या सूटला सोना सूट म्हटलं जातं. हा सूट घातल्यानंतर शरीरातून वॉटर रिटेंशन केलं जातं. हा प्लास्टिक आणि रबराने बनलेला ट्रॅक सूट असतो. त्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते. हिट शरीरातून बाहेर पडत नाही. हा सूट साधारणपणे नियोप्रीन, पीव्हिसी आणि नायलॉनने बनलेला असतो.
हा सूट घालून सोना बाथ घेतल्यावर शरीरातून वेगाने पाणी बाहेर येतं. म्हणजे प्रचंड घाम निघतो. वारंवार शौचाला आल्याने शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे शरीरातील वॉटर रिटेंशन कमी होतं. आणि वजन कमी होतं.
हा सूट रेनकोट सारखा असतो. गळा आणि मनगटाजवळ टाइट बांधला जातो. त्यामुळे शरीरात हवा जात नाही. त्याशिवाय याच्या ट्राऊझरच्या खाली पॅक असतं. त्यामुळे हवा आत जात नाही. उष्णता निर्माण झाल्याने प्रचंड उकडतं. त्यानंतर घाम येतो. त्यामुळे वजन कमी होतं.
जेव्हा कधी अॅथलीटना कमी वेळात वजन कमी करायचं असतं तेव्हा ते हा सूट घालतात. हा सूट घालून वर्कआऊट केल्यावर आणि सोना बाथ घेतल्यावर शरीरातून घामाच्या धारा निघतात. शरीरातून वॉटर रिटेंशन कमी होतं. वजनही प्रचंड कमी होतं. मात्र, हा सूट घालण्याने मोठं नुकसान होत असल्याचंही एक्सपर्ट सांगतात. त्यामुळे सातत्याने हा सूट घालू नका असं सांगितलं जातं. त्यामुळे शरीरातील पाणी कमी होतं.