मोबाईल गेम खेळण्यासाठी 10 वर्षीय मुलाने 35 हजार रुपये उडवले

उत्तर प्रदेशातील एका 10 वर्षीय मुलाने मोबाईल गेम (Mobile Game) खेळण्यासाठी तब्बल 35 हजारु रुपये उडवले आहे. मुलगा मोबाईल गेम खेळत असताना त्याला नवीन हत्यार घेण्यासाठी पैशांची गरज भासत होती.

मोबाईल गेम खेळण्यासाठी 10 वर्षीय मुलाने 35 हजार रुपये उडवले
Follow us
| Updated on: Sep 06, 2019 | 1:18 PM

लखनऊ : उत्तर प्रदेशातील एका 10 वर्षीय मुलाने मोबाईल गेम (Mobile Game) खेळण्यासाठी तब्बल 35 हजारु रुपये उडवले आहे. मुलगा मोबाईल गेम खेळत असताना त्याला नवीन हत्यार घेण्यासाठी पैशांची गरज भासत होती. त्यामुळे त्याने थेट आपल्या वडिलांच्या अकाऊंटमधील पैसे उडवले आहेत. बँक अकाऊंटमधील (Bank Account) पैसे उडत असल्याने मुलाच्या वडिलांनी पोलिसांना कळवले. पोलिसांच्या सायबर सेलने तातडीने याचा शोध घेतल्यानंतर मुलानेच गेम खेळताना पैसे उडवल्याचे समोर आलं आहे.

हा मुलगा पाचवीमध्ये शिकत आहे. त्याला ‘फ्री फायर’ नावाच्या गेमची सवय लागली आहे. गेममध्ये त्याला अनेकदा हत्यार खरेदीसाठी पैशाची गरज पडली. यावेळी मुलाने वडिलांच्या फोनमध्ये पेटीएम अकाऊंट बनवले. जेव्हा गरज असेल तेव्हा मुलाने पैसे ट्रान्सफर करुन घेतले.

वडिलांनी जेव्हा आपल्या खात्याचे स्टेटमेंट काढले तेव्हा त्यांना धक्का बसला. सायबर सेलमध्ये त्यांनी तक्रार केली तेव्हा समजले की, ज्या नंबरवर पैसे ट्रान्सफर झाले आहे तो त्यांचाच नंबर आहे. सायबर सेलने जेव्हा मुलाची चौकशी केली तेव्हा त्याने याची कबुली दिली.

मुलाने वडिलांच्या तीन खात्यातील पैसे उडवले. त्याने तयार केलेल्या पेटीएम वॉलेटमध्ये दहा हजार रुपये बाकी होते. ते पैसे पोलिसांनी बँकेत ट्रान्सफर केले आहेत. मुलाच्या पराक्रमाने वडिलांना धक्का बसला असून त्यांनी तक्रार मागे घेतली.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.