मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दोन दिवसात 20 कोटी, कुणी किती दिले?

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत योगदान देण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दोन दिवसात 20 कोटी, कुणी किती दिले?
Follow us
| Updated on: Aug 16, 2019 | 11:36 AM

CM Relief Fund  मुंबई: पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत (CM Relief Fund ) योगदान देण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्याला दानशूर आणि संवेदनशील व्यक्ती, संस्था सढळ हाताने मदतीचा हात देत आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दोन दिवसात 20 कोटी रुपये जमा झाले आहेत. या निधीत पहिल्या दिवशी 14 कोटी तर दुसऱ्या दिवशी 6 कोटी जमा झाले.

हळव्या मनाचा युवा साहित्यिक आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेता लेखक सुशीलकुमार शिंदेने त्याच्या पुरस्काराची 50 हजार रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला दिली.

कोल्हापूर, सांगली, सातारा, कोकण, नाशिकसह गडचिरोली या भागात महापुराचा मोठा फटका बसला आहे. कोल्हापूर-सांगली जिल्ह्याचं अतोनात नुकसान झालं आहे. या जिल्ह्यांना पुन्हा उभं करण्यासाठी मदतीची गरज आहे.

त्यासाठी राज्यभरातून विविध सामाजिक संस्था, औद्योगिक क्षेत्रातील घटक, व्यावसायिक, त्यांच्या संस्था-संघटना, लोकप्रतिनिधी, नागरिकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत प्रत्यक्ष जमा करणे किंवा पाठविणे सुरू केले आहे. व्यक्तिगत स्वरुपाच्या काही हजारांपासून, सामूहिकरित्या एकत्र केलेल्या लाखों रुपयांपर्यंतची मदत सहाय्यता निधीमध्ये जमा करण्याचा ओघ सुरु आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीत कुणी किती दिले?

सैफी फाऊंडेशनकडून एक कोटी रुपये, सारस्वत बँकेच्या वतीने एक कोटी रुपये आकाश इन्स्टिट्युटच्या वतीने 51 लाख रुपये, अलॉन्सन प्रायव्हेट लिमिटेड कडून 50 लाख रुपये, इन्फ्राकन्स्ट्रक्शन लिमिटेडकडून 25 लाख रुपये,  सदगुरू श्री. साखर कारखाना यांच्या वतीने 22 लाख रुपये, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून 25 लाख रुपये,  मर्सिडीज बेंझ कंपनीच्या वतीने 25 लाख रुपये आणि कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या वतीने तीन लाख 60 हजार रुपये,  खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्याकडून 25 लाख 52 हजार 852 रुपये, भारतीय जनता पार्टी, मुंबई उत्तर पश्चिम विभागाच्या कडून 21 लाख रुपये, बोरीवली मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीने 25 लाख रुपये,  मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने सतरा लाख 72 हजार रुपये,  आमदार मनिषा चौधरी यांच्या मतदार संघातील विविध संस्था संघटना आदींकडून 15 लाख, 43 हजार रुपये, सुगी समुहाचे निशांत देशमुख यांच्याकडून 11 लाख रुपये, महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाकडून दहा लाख रुपये, भाजपच्या उत्तर पुर्व विभागाक़डून दहा लाख रुपये, व्हॅल्यूएबल ग्रुपकडून दहा लाख रुपये, संजय शिंदे यांच्याकडून 11 लाख रुपये, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना आणि कारखान्याच्या कर्मचाऱ्यांकडून 10 लाख 4 हजार रुपये, श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था धुळे यांच्या वतीने सात लाख 77 हजार रुपये तर संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत केले यांच्या वतीने 1 लाख 11 हजार रुपये, मुलुंडच्या प्रेरणा युवक ट्रस्टकडून पाच लाख रुपये,  एस नरेंद्रकुमार आणि कंपनीकडून पाच लाख रुपये, फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज कडून पाच लाख रुपये, एस. आर. भल्ला आदींकडून पाच लाख रुपये, मराठवाडा लोकविकास मंचकडून पाच लाख रुपये, खासदार कपिल पाटील यांच्याकडून पाच लाख रुपये, मुलुंड सेवा संघाकडून एक लाख पंचवीस हजार रुपये, फ्युएल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष केतन देशपांडे यांच्याकडून साडेतीन लाख रुपये, याच संस्थेचे मुख्य प्रवर्तक संतोष हुरलीकोप्पी यांच्याकडून अडीच लाख रुपये, आमदार भारती लव्हेकर यांच्या पुढाकारातून जमा करण्यात आलेले २ लाख ७१ हजार १०० रुपये, शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांच्याकडून १ लाख ५० हजार रुपये, सेव्हिलीयर क्लिनिकल सप्लाईज सर्व्हिसेसकडून १ लाख ११ हजार रुपये, हेतल गाला यांच्याकडून १ लाख ११ हजार रुपये, योगेश कटारिया यांच्याकडून १ लाख १ हजार रुपये, सन्नी सानप यांच्याकडून १ लाख रुपये, शकुंतला ठक्कर यांच्याकडून १ लाख रुपये, बांद्रा पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून १ लाख रुपये,खार दांड्यातील दांडा कोळी समाजाकडून १ लाख रुपये. यासह अनेक लोकप्रतिनिधीं, उद्योजक, व्यावसायिक, त्यांच्या संघटना विविध संस्था-संघटना, मान्यवरांकडून निधीसाठी धनादेश स्वरुपात योगदान देण्याचा ओघ सुरुच आहे.

Non Stop LIVE Update
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.