धक्कादायक! पोलादपूरमधल्या ‘या’ ठिकाणीच घडला अपघात, 2 जणांचा मृत्यू, 34 गंभीर जखमी

काळोख असल्याने खोल दरीतून जखमींना बाहेर काढण्यात अडचणी येत आहेत.

  • हर्षल भदाणे पाटील, मेहबूब जमादार, टीव्ही 9 मराठी, रायगड
  • Published On - 20:31 PM, 8 Jan 2021
धक्कादायक! पोलादपूरमधल्या 'या' ठिकाणीच घडला अपघात, 2 जणांचा मृत्यू, 34 गंभीर जखमी

पोलादपूरः लग्नाचा वऱ्हाड घेऊन येणारा टेम्पो पोलादपूर तालुक्यातील कुडपण येथे खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात दोघे जण ठार झालेत. ही घटना सायंकाळी 7.00 वाजताच्यादरम्यान घडल्याची प्राथमिक माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिलीय. या अपघातात 34 गंभीर जखमी झाले असून, 25 किरकोळ जखमी आहेत.(Poladpur Road Accident In 2 Killed, 25 Injured)

रत्नागिरी जिल्ह्यातून लग्नाचा वऱ्हाड घेऊन अपघातग्रस्त टेम्पो पोलादपूर तालुक्यातील कुडपण येथे येत होता. याच वेळेस रस्त्याचा अंदाज न आल्याने टेम्पोचालकाचा ताबा सुटला. या टेम्पोमध्ये 70 हून अधिक वऱ्हाडी होते. काळोख असल्याने खोल दरीतून जखमींना बाहेर काढण्यात अडचणी येत आहेत. घटनेची माहिती स्थानिकांनी पोलादपूर पोलीस ठाण्याला देताच पोलादपूर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी धाव घेतली.

अपघाताचे स्वरूप मोठे असल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने बचावकार्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवलीय. यातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता स्थानिकांनी वर्तवलीय. ज्या जखमींना बाहेर काढण्यात यश आलेले आहे, त्यांना पोलादपूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात येत आहे. अपघाताचे स्वरूप मोठे असल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने बचावकार्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवलीय. यातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता स्थानिकांनी वर्तवलीय. ज्या जखमींना बाहेर काढण्यात यश आलेले आहे, त्यांना पोलादपूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात येत आहे. पोलादपूर तालुक्यातील खडपी गावातून लग्नाचे वऱ्हाड कुडपण येथे गेले होते. लग्न लावून परत येत असताना हा अपघात झालाय.

काळोख असल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत, काही लोक रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील खवटी येथील असल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय, तर काही जण धनगरवाडी येथील असल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय. खेडमधून रेस्क्यू टीम आणि शासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचलेत. या बचावकार्यात 30-40 जण जखमी असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलादपूर अपघातातील जखमींच्या उपचारासाठी पोलादपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय यंत्रणा सज्ज झाली असून, पोलादपूर, माणगाव परिसरातील वैद्यकीय यत्रंणा पोलादपूरकडे पोहोचली आहे.

2 वर्षांपूर्वी झालेल्या आंबेनळी घाटातील अपघाताची आठवण

पोलादपूर तालुक्यातील दुर्गम आणि शेवटचे टोक असल्याने कुडपण मार्गावर धनगरवाडी येथील वळणावर ट्रॅक सुमारे 200 फुटांपेक्षा जास्त खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला. यामध्ये रत्नागिरीतील खेड तालुक्यातील खवटी धनगरवाडी येथील वऱ्हाड असल्याची प्राथमिक माहिती मिळालीय. ट्रक दरीत कोसळल्याने 2 वर्षांपूर्वी झालेल्या आंबेनळी घाटातील अपघाताची पुनरावृत्ती होते की काय, अशी भीती व्यक्त करण्यात येत असल्याने अनेक ट्रेकर्स घटनास्थळी रवाना झालेत. शुक्रवारी सायंकाळी 7 च्या सुमारास कुडपण गावात लग्न कार्यासाठी आलेल्या वऱ्हाड मंडळींच्या गाडीला लग्नकार्य आटोपून खेड खवटी धनगरवाडीकडे परतताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी खोल दरीत कोसळली, या अपघाताची माहिती मिळताच मदत ग्रुप खेड, महाबळेश्वर टेकर्स, पोलादपूरसह महाड येथील टीम घटनास्थळी दाखल झाल्यात.

या ट्रॅकमध्ये 70 ते 80 पेक्षा जास्त जण असल्याची प्राथमिक माहिती

या ट्रॅकमध्ये 70 ते 80 पेक्षा जास्त जण असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झालीय. यापैकी अनेक जण जखमी झाले आहेत, तर आतापर्यंत दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या वऱ्हाडाने संपूर्ण ट्रक भरलेला होता. घटनास्थळी पोलीस, ट्रेकर्स रवाना झाले आहेत. घटनास्थळी ग्रामस्थांच्या मदतीने मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आलेय.

स्थानिक आमदार भरतशेठ गोगावले यांची घटनास्थळी धाव

या घटनेची माहिती समजतात स्थानिक आमदार भरतशेठ गोगावले यांनी घटनास्थळी धाव घेतली, तर खेडचे नगराध्यक्ष तथा मनसे नेते वैभव खेडेकर हेसुद्धा घटनास्थळी दाखल झालेत. या भीषण घटनेची पार्श्वभूमी लक्षात घेऊन सर्व स्तरांतून मदतकार्य सुरू असून, पोलादपूर प्रशासन, लोकप्रतिनिधी, स्थानिक ग्रामस्थ अशा सर्वस्तरांतून मदतीचा ओघ सुरू आहे. मात्र अंधारी रात्र आणि रिमझिम पावसाचा सामना करत दरीत कोसळलेल्या ट्रकमधील जखमींना वर काढण्यासाठी टेकर्स पोलीस प्रशासन आणि नागरिकांना तारेवरची कसरत करीत आहेत.

संबंधित बातम्या

आंबेनळी घाटात पुन्हा अपघात, 58 प्रवाशांसह बस कोसळली

रत्नागिरीत भीषण अपघात; खासगी बस 50 फूट खोल दरीत कोसळली

Poladpur Road Accident In 2 Killed, 25 Injured