नदीच्या किनारी लहान मुलाला खेळताना 2 हजार आधारकार्ड सापडले

नदीच्या किनारी लहान मुलाला खेळताना 2 हजार आधारकार्ड सापडले
सध्याच्या काळात आधार कार्ड खूप महत्वाचे आहे. सिम कार्ड घेण्यापासून पीएफसारख्या अनेक सेवांसाठी आधार कार्ड असणे फार महत्वाचे आहे. त्यामुळे सरकारी योजनांपासून अगदी घरगुती कामकाजासाठी आधार कार्ड गरज भासते. सध्या बऱ्याच ठिकाणी आधारकार्डचा वापर हा मुख्य ओळखपत्र म्हणूनही केला जात आहे.

चेन्नई : राज्य आणि केंद्र सरकारच्या अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी सध्या आधारकार्ड गरजेचं आहे. मात्र नुकतंच एका नदीच्या किनाऱ्यावर जवळपास 2 हजार आधारकार्ड सापडले आहेत. तमिळनाडूतील तंजावूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आधार कार्ड हे भारतीय नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचं असं ओळखपत्र आहे. यूनिक आइडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAI हे 12 अंकी कार्ड जारी करतं. हे एक डिजीटल आयडी प्रुफ आहे, याच्या माध्यमातून तुम्ही सरकारी योजनांचा लाभ मिळवू शकता. मात्र नुकतंच तमिळनाडूतील मुल्लीयारु नदीच्या किनाऱ्यावर 2 हजार आधारकार्ड सापडली आहेत.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तमिळनाडूच्या मुल्लियारु नदीच्या किनाऱ्यावर काही दिवसांपूर्वी एक लहान मुलगा खेळत होता. त्याचवेळी त्याला एका प्लास्टिकच्या पिशवी सापडली. या पिशवीत जवळपास दोन हजार आधारकार्ड होती. त्याने ही पिशवी त्याच्या आई-वडिलांकडे दिली. त्यानंतर त्याच्या आई वडिलांनी याबाबत पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदवली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नदीच्या किनाऱ्यावर सापडलेले हे सर्व आधारकार्ड कट्टीमेंडू, आथीरांगम, वाडापथी, सेक्कल या गावातील नागरिकांचे आहेत. या आधारकार्डाची छपाई दोन वर्षापूर्वी करण्यात आली होती. मात्र पोस्टातील कर्मचाऱ्यांनी संबंधित ठिकाणी वितरण न केल्याने ही आधारकार्ड नागरिकांपर्यंत पोहोचलीच नाही. त्यानंतर काही अज्ञात व्यक्तींनी ही आधारकार्ड प्लास्टिकच्या पिशवीत भरून मुल्लीयारु नदीत फेकल्याची शक्यता आहे. दरम्यान सध्या याबाबत पोस्टातील अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येणार आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI