जबरदस्तीने दारु पाजून पुण्यात 22 वर्षीय तरुणीवर मित्रांकडून बलात्कार

पुणे : तरुणीला जबरदस्तीने दारु पाजून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना पुण्यात घडली. खोटं कारण सांगून तरुणीला पिसोळी परिसरातील डोंगरावर नेण्यात आलं. तिच्या मित्रांनीच तिला दारु पाजली आणि शनिवारी सांयकाळी तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी दोघांना अटक केली. 22 वर्षीय तरुणीने याबाबत फिर्याद दिली. पीडित तरुणी माळवाडी परिसरात राहते. मे 2018 मध्ये तिच्या पतीचे […]

जबरदस्तीने दारु पाजून पुण्यात 22 वर्षीय तरुणीवर मित्रांकडून बलात्कार
Follow us
| Updated on: May 27, 2019 | 7:26 PM

पुणे : तरुणीला जबरदस्तीने दारु पाजून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना पुण्यात घडली. खोटं कारण सांगून तरुणीला पिसोळी परिसरातील डोंगरावर नेण्यात आलं. तिच्या मित्रांनीच तिला दारु पाजली आणि शनिवारी सांयकाळी तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी दोघांना अटक केली. 22 वर्षीय तरुणीने याबाबत फिर्याद दिली.

पीडित तरुणी माळवाडी परिसरात राहते. मे 2018 मध्ये तिच्या पतीचे निधन झाल्यामुळे ती लहान मुलाला घेऊन आईसोबत राहते. दोन वर्षांपूर्वी तिची रिक्षाचालक कृष्णा जाधव याच्यासोबत ओळख झाली. दुसरा आरोपी अक्षय हा कृष्णाचा मित्र असल्यामुळे त्याच्यासोबतही तिची मैत्री झाली. शनिवारी 25 मे रोजी फिर्यादी घरी असताना तिला अक्षयचा फोन आला आणि कृष्णा जाधव आजारी असल्याचं सांगून भेटण्यासाठी बोलावलं.

त्यानंतर अक्षय गाडी घेऊन आला आणि फिर्यादीला घेऊन गेला. या दोघांना गोंधळेनगर येथे आरोपी कृष्णा भेटला. त्यांनी एका दुकानातून दारू विकत घेतली आणि हे सर्व पिसोळी येथील डोंगरावर गेले. त्या ठिकाणी दोघा आरोपींनी दारू प्यायली आणि पीडितेलाही जबरदस्तीने दारू पाजली. त्यानंतर कृष्णा जाधव याने तिच्यावर बलात्कार केला. अक्षय चव्हाण यानेही तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला असता तिने विरोध केला. तेव्हा अक्षय याने तिला चपलेने मारहाण केली आणि जबरी बलात्कार केला. आरोपींनी अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

फिर्यादीने आरडाओरडा केला तेव्हा जवळून जाणाऱ्या दोन महिला धावून आल्या. यावेळी आरोपींनी तेथून पळ काढला. त्या महिलांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पीडितेला ससून रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करत दोन्ही आरोपींना अटक केली.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.