रुबी मिल्स व्यवस्थापन नरमलं, ‘त्या’ 34 कामगारांना पुन्हा रुजू करणार, मागण्या मान्य झाल्याने शिवसेनेचा मोर्चा स्थगित

शिवसेनेने मोर्चाचा इशारा दिल्यानंतर रुबी मिल व्यवस्थापन नरमलं आहे. कामावरुन काढून टाकलेल्या 34 कामगारांना परत कामावर रुजू करण्याची मागणी व्यवस्थापनाने मान्य केली आहे.

रुबी मिल्स व्यवस्थापन नरमलं, 'त्या' 34 कामगारांना पुन्हा रुजू करणार, मागण्या मान्य झाल्याने शिवसेनेचा मोर्चा स्थगित
Follow us
| Updated on: Nov 28, 2020 | 9:10 AM

रायगड : लॉकडाऊनमध्ये खालापूर तालुक्यातील रुबी मिल्स (Ruby Mills) या कारखान्यातील 34 कायमस्वरुपाच्या कामगारांना कामावर काढून टाकण्यात आले होते. परंतु शिवसेनेने (Shivsena) त्याविरोधात मोर्चाचा (Protest) इशारा दिल्यानंतर मिल व्यवस्थापन नरमलं आहे. कामावरुन काढून टाकलेल्या 34 कामगारांना परत कामावर रुजू करण्याची मागणी व्यवस्थापनाने मान्य केली आहे. (34 workers will be re-employed in ruby mills, ShivSena protest postponed)

लॉकडाऊनमध्ये खालापूर तालुक्यातील रुबी मिल्स या कारखान्यातील 34 कायम स्वरुपाच्या कामगारांना कामावर काढून टाकण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्या उपजिविकेच्या प्रश्न निर्माण झाला होता. या स्थानिक कामगारांवर आणि स्थानिक शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाविरोधात खालापूर तालुका शिवसेनेच्या वतीने खरसुडीं येथील रुबी मिल्सवर 1 डिसेबंर रोजी मोर्चा नेण्याची घोषणा करण्यात आली होती.

शिवसेनेच्या इशाऱ्यानंतर आज खालापूर तहसील कार्यालयात आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत तहसीलदार चप्पलवार, खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी सजंय शुक्ला, खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल विभुते, सहाय्यक कामगार उपायुक्त पवार, कपंनी व्यवस्थापक भरतभाई शाह यांच्यासोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये शिवसेनेच्या मागण्या मान्य करुन कामावरुन काढलेल्या सर्व 34 कामगारांना सोमवारपासून कामावर घेण्याचे व्यवस्थापनाने मान्य केले आहे. तसेच पगार कपात करण्यात आलेल्या कामगारांच्या बाबतीत योग्य तो निर्णय घेण्याबाबत व्यवस्थापनाने होकार दर्शविला आहे.

दरम्यान, स्थानिक शेतकरी दिगंबर सालेकर यांच्या जमिनीचा प्रश्न सोडव्यासाठी भूमिअभिलेख सर्वे करुन त्यांना योग्य तो न्याय देण्याचे व्यवस्थापनाने मान्य केल्याचे आमदार थोरवे यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले आहे. तसेच शिवसेनेने पुकारलेला धडक मोर्चा स्थगित करण्यात आल्याचेही आमदार थोरवे यांनी जाहीर केले. यावेळी शिवसेनेचे सपंर्कप्रमुख विजय पाटील, जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे, तालुकाप्रमुख संतोष विचारे, उपतालुका प्रमुख सजंय देशमुख, माजी तालुका प्रमुख उमेश गावंड, स्थानिक नेते सुरेश कडव, मनोहर देशमुख यांच्यासह अनेक स्थानिक शिवसेना नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इतर बातम्या

Maharashtra lockdown : 31 डिसेंबरपर्यंत राज्यात लॉकडाऊन वाढवला, ठाकरे सरकारचा निर्णय

वाढीव वीजबिलाविरोधातील मोर्चा मसनेला पडला महागात, 125 ते 150 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

हापूस प्रेमींसाठी चिंतेची बातमी, लांबलेल्या पावसाने यंदा हापूसची चव चाखायला वाट पहावी लागणार

(34 workers will be re-employed in ruby mills, ShivSena protest postponed)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.