‘टिक टॉक’वर आक्षेपार्ह व्हिडीओ पोस्ट केल्याने पाच तरुणांवर गुन्हा दाखल

टिक टॉक अॅपवर आक्षेपार्ह व्हिडीओ पोस्ट केल्याने मुंबई पोलिसांनी पाच तरुणांवर गुन्हा दाखल केला. या व्हिडीओमध्ये त्यांनी झारखंडमध्ये झालेल्या तबरेज अन्सारीच्या हत्येचा उल्लेख केला आहे.

'टिक टॉक'वर आक्षेपार्ह व्हिडीओ पोस्ट केल्याने पाच तरुणांवर गुन्हा दाखल
Follow us
| Updated on: Jul 09, 2019 | 8:25 AM

मुंबई : टिक टॉक अॅपवर आक्षेपार्ह व्हिडीओ पोस्ट केल्याने मुंबई पोलिसांनी पाच तरुणांवर गुन्हा दाखल केला. या व्हिडीओमध्ये त्यांनी झारखंडमध्ये झालेल्या तबरेज अन्सारीच्या हत्येचा उल्लेख केला आहे. हा व्हिडीओ अपलोड होताच काहीवेळात त्यांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली. फैजल शेख, हसनैन खान, अदनान शेख, फैज बलोच, साधन फारुकी या तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस या तरुणांचा शोध घेत आहे.

या तरुणांनी टिक टॉक अॅपवर तबरेज अन्सारीच्या हत्येचा उल्लेख केला. यामध्ये ते म्हटले, जर त्याच्या मुलाने उद्या बदला घेतला तर प्रत्येक मुसलमान आतंकवादी असतो असे म्हणून नका, असे सांगत हा व्हिडीओ बनवला आणि तो अपलोड केला. व्हिडीओलाही कमी वेळात प्रसिद्धी मिळाली आणि तो व्हायरल झाला.

हा व्हिडीओ त्यांनी “टीम 07” या नावाखाली बनवून अपलोड केला होता. हा व्हिडीओ शिवसेनेचे पदाधिकारी रमेश सोळंकी यांनी पाहिल्यानंतर त्यांनी मुंबई पोलिसांच्या एलटी मार्ग पोलीस स्टेशनला याची तक्रार केली. यानंतर मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने या पाच जणांविरोधात कलम 153 (a) च्या अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. तर टिक टॉककडून त्यांचे अकाउंटही सस्पेंड करण्यात आले आहे.

या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे दोन समाजात वाद होण्याची शक्यता होती. त्यामुळे तातडीने हा व्हिडीओ टिक टॉकवरुन हटवण्यात आला. पोलिसांनी या पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरु आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

काय आहे तबरेज अन्सारी प्रकरण?

तबरेज अन्सारीवर बाईक चोरीचा आरोप करत गावातील लोकांनी बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत तबरेजचा मृत्यू झाला होता. ही घटना झारखंडमधील सरायकेला-खरसावा जिल्ह्याच्या घातकीडी येथे घडली होती. तबरेजकडून गावकऱ्यांनी ‘जय श्री राम’ आणि ‘जय हनुमान’ या घोषणाही बोलून घेतल्या होत्या आणि तो मुसलमान असल्याने त्याला मारहाण केली,  असा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला. या प्रकरणात आतापर्यंत एकूण 11 जणांना अटक केली असून पोलीस अधिक तपास करत आहे.

Non Stop LIVE Update
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....