तुर्कस्तानमध्ये भूकंपाचा तीव्र धक्का, 10 इमारती जमीनदोस्त

तुर्कस्तानच्या पूर्वेकडील राज्यांमध्ये शुक्रवारी रात्रीच्या सुमारास 6.8 रिश्टर स्केलचा भूकंपाचा तीव्र हादरा बसला (turkey earthquake) आहे.

तुर्कस्तानमध्ये भूकंपाचा तीव्र धक्का, 10 इमारती जमीनदोस्त

इस्तांबूल (तुर्कस्तान) : तुर्कस्तानच्या पूर्वेकडील राज्यांमध्ये शुक्रवारी रात्रीच्या सुमारास 6.8 रिश्टर स्केलचा भूकंपाचा तीव्र हादरा बसला (turkey earthquake) आहे. यात जवळपास 18 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 500 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, तुर्कस्तानची राजधानी अंकारापासून 750 किमी पूर्व इलाजिंग प्रदेशातील सिवारीसमध्ये भूकंपाचा तीव्र हादरा बसला.

स्थानिक वेळेनुसार, रात्री 8.55 च्या सुमारास भूकंपाचे हादरे बसले. एकट्या एलाजिंगमध्ये 13 आणि इतर प्रदेशात 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती तुर्कस्तानचे आरोग्य मंत्री फहरेटिन कोका यांनी दिली. हा भूकंप एवढा जबरदस्त होता की 10 इमारती जमीनदोस्त झाल्या.

या भूकंपात 500 लोक जखमी झाले आहे. या सर्वांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींमधील 2 जणांची प्रकृती गंभीर असल्याचीही माहिती मिळत (turkey earthquake) आहे.

तर अनेक घर कोलमडली असून ठिकठिकाणी इमारती कोसळल्या आहेत. या इमारतीखाली 30 जण अडकल्याची शक्यता वर्तवली आहे. त्याना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. हा भूकंप 10 ते 12 सेकंदापर्यंत चालला.

या भूकंपाचे झटके इराक, सीरिया आणि लेबनान या देशांनाही जाणवले. दरम्यान तुर्कस्तानप्रमाणे इतर देशात मात्र कोणतेही नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI