स्मगलिंगच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, तब्बल 66 किलो सोनं जप्त

स्मगलिंगच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, तब्बल 66 किलो सोनं जप्त

मुंबई : सोने तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा महसूल गुप्तचर यंत्रणेने (DRI) पर्दाफाश केला आहे. लखनऊ, कोलकत्ता आणि सिलिगुडीमध्ये महसूल गुप्तचर यंत्रणेने धडाकेबाज कारवाई केली. या कारवाईत तब्बल 66 किलो सोनं जप्त करण्यात आलं. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत सुमारे 21 कोटी रुपये आहे.

महसूल गुप्तचर यंत्रणेकडून कारवाईत चार जणांना अटकही केली आहे. तसेच, तस्करीसाठी वापरण्यात आलेल्या चार कार जप्त करण्यात आल्या आहेत. या चारही कारमध्ये सोन्याच्या चीप लावण्यात आल्या होत्या, असे समोर आले आहे.

पश्चिम बंगालमधील भारत-भूतान सीमेवरुन भूतानमधून सोन्याची तस्करी करण्यात येत होती. भारताच्या वेगवेगळ्या भागात हे तस्करी केलेले सोने पाठवले जात होते.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI