पुण्यात फूटपाथवरील अडीच वर्षीय चिमुकलीवर रेल्वेच्या बोगीत बलात्कार

पीडित चिमुकली पुणे स्टेशन बाहेरील फूटपाथवर आई-वडीलांसोबत राहत होती. मंगळवारी सकाळी या अडीच वर्षाच्या मुलीला झोपेतून उचलून रेल्वेच्या बोगीत नेले आणि तिच्यावर बलात्कार केला.

पुण्यात फूटपाथवरील अडीच वर्षीय चिमुकलीवर रेल्वेच्या बोगीत बलात्कार
Follow us
| Updated on: Aug 28, 2019 | 11:05 AM

पुणे : बलात्कारानंतर अत्यवस्थ असलेल्या अडीच वर्षीय चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अवघ्या अडीच वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार झाल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली होती. काल झालेल्या या घृणास्पद कृत्यानंतर पीडित चिमुकलीला पुण्यातील ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) दाखल करण्यात आले होते. मात्र आज तिचा मृत्यू झाला.

पीडित चिमुकली पुणे स्टेशन बाहेरील फूटपाथवर आई-वडीलांसोबत राहत होती. मंगळवारी सकाळी या अडीच वर्षाच्या मुलीला झोपेतून उचलून रेल्वेच्या बोगीत नेले आणि तिच्यावर बलात्कार केला.

यानंतर गस्तीवर असलेल्या पोलिसांना रेल्वेच्या बोगीत बेशुद्ध अवस्थेत ही मुलगी आढळून आली. त्यावेळी तिला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

या प्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतलं आहे. पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत.

हरियाणातही अडीच वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार

तिकडे हरियाणातही एका 15 वर्षीय मुलाने अडीच वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार केला आहे.  26 ऑगस्ट रोजी ही धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. बलात्कार करणाऱ्या 15 वर्षीय मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास करत आहेत.

अडीच वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाल्याच्या दोन घटना देशात घडल्याने पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तसेच आजही लहान मुली आणि महिला सुरक्षित नसल्याचे समोर आलं आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.