Pune crime|नवले पुलावर अपघाताचे सत्र सुरूच ; अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

आज दुपारच्या सुमारास चारचाकी वाहनाने पादचाऱ्याला उडवल्याची घटना घडली आहे. या घटनेत पादचाऱ्याचा जागेवरच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच सिंहगड या रस्ता पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नितीन जाधव, या अमोल काळे व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेतली.

Pune crime|नवले पुलावर अपघाताचे सत्र सुरूच ; अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू
संग्रहित छायाचित्र.

पुणे – मुंबई – बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील नवले पुलावर अपघाताचे सत्र कायम सुरूच आहे. काल(रविवारी) तीन ट्रक एकमेकांवर आदळल्याची घटना ताजी असताना आज दुपारच्या सुमारास चारचाकी वाहनाने पादचाऱ्याला उडवल्याची घटना घडली आहे. या घटनेत पादचाऱ्याचा जागेवरच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच सिंहगड या रस्ता पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नितीन जाधव, या अमोल काळे व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेतली. या अपघात मृत्युमुखी पडलेला पादचारी असल्याची मनोरुग्ण असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याबाबत धडक दिलेल्या अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सिंहगड पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

पोलिसांनीच उचलला मृतदेह अपघाताची घटना घडल्यानंतर पोलिसांनी काहीकाळ वाहतूक थांबविली होती. रुग्णवाहिका आल्यानंतर मृतदेह उचलण्यासाठी कोणीच नागरिक येत नसल्याचे पाहून पोलीस उपनिरीक्षक नितीन जाधव, अमोल काळे व कर्मचाऱ्यांनी स्वतःच मृतदेह रुग्णवाहिकेत उचलून ठेवला. त्यानंतर वाहतुकीसाठी रस्ता खुला करण्यात आला.

अपघात रोखण्यासाठी होतेय उपाय योजनेची मागणी बाह्यमार्गावर असलेला दरी पूल ते नवले पूल यादरम्यान उतार आहे. या मार्गावरून मोठ्याप्रमाणातअवजड वाहनांची वर्दळ असते. अनेकदा वाहनवरील नियंत्रण सुटल्याने अपघात घडतात. या भागातील नागरिकांना सातत्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामनाही करावा लागतो. केवळ याच परिसरात सातत्याने होत असलेले अपघातामुळं स्थानिक नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या भागातील अपघातांची वाढती संख्या लक्षात घेऊन अपघात रोखण्यासाठी ठोस उपाय योजना करणे आवश्यक आहे. तशी मागणीही या भागातील रहिवाश्यांनी व स्थानिक लोकप्रतिनिधीनी केली आहे. मात्र याबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही.

Anil parab : हिवाळी अधिवेशनच्या तारखा ठरल्या, लसीकरणाचे दोन डोस घेतलेल्यांनाच अधिवेशनात प्रवेश

‘Pushpa : The Rise’मध्ये समंथा प्रभूचा ‘आयटम नंबर’, अल्लू अर्जुनसोबत जमणार जोडी!

प्रेयसीसोबत अनेक वर्षांची ‘पार्टनरशिप’, मुंबईकर ‘लॉर्ड’ शार्दुल ठाकूरचा साखरपुडा

Published On - 3:34 pm, Mon, 29 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI