नाशिकमध्ये PSI वर बलात्काराचा आरोप

नाशिकमध्ये PSI वर बलात्काराचा आरोप

नाशिक : नाशिकमध्ये पोलिस उपनिरीक्षकाने (PSI) बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. नाशिकरोड उपनगर पोलिस ठाण्यात याबाबात पीडित महिलेने तक्रार दाखल केली आहे. पीएसआय आणि त्याचा मित्र 2014 पासून बलात्कार करत असल्याचा गंभीर आरोप पीडित महिलेने केला आहे.

याबाबत पोलिसात तक्रार केल्यास फेसबुक फोटो टाकून बदनामी करेन, तसेच तुझ्या नवऱ्याला जीवानिशी मारुन टाके, अशी धमकीही आरोपी पीएसआय आणि त्याच्या मित्राने पीडित महिलेला दिली. विशेष म्हणजे, पीडित महिलेचा पतीदेखील पोलिस सेवेत असल्याची माहिती समोर आली आहे.

आरोपी पीएसआय आणि त्याच्या मित्राविरोधात नाशिकरोड उपनगर पोलिस ठाण्यात बलात्काराच्या तक्रारीसह अॅट्रोसिटीची तक्रारही पीडित महिलेने केली आहे.

या घटनेमुळे नाशिक पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेबाबत आरोपी पीएसआय आणि त्याच्या मित्राचा नाशिकरोड पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI