पुण्यात तरुणावर अॅसिड हल्ला करून पोलिसांवर गोळीबार

पुण्यात तरुणावर अॅसिड हल्ला करून पोलिसांवर गोळीबार

पुणे : पुण्यातील विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या परिसरात एका अज्ञात व्यक्तीने 23 वर्षीय तरुणावर अॅसिड हल्ला केला. या अॅसिड हल्ल्यानंतर आरोपीने पोलिसांवरही गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या अॅसिड हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे पुणे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पुण्यातील विश्रांतीबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीतील स्वप्नगंधा सोसायटीत मंगळवारी 16 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास एका तरुणावर अॅसिड हल्ला करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी झालेला तरुण पुण्यातील टिळक रोडवर एका मैत्रिणीसोबत बोलत थांबला होता. अचानक एका अज्ञात व्यक्तीने तरुणाच्या तोंडावर आणि पाठीवर अॅसिड फेकले. यानंतर तरुणाच्या मैत्रिणीने आरडाओरड केली. यानंतर घाबरलेल्या आरोपीने पोलिसांवर बंदुकीने गोळीबार केला. दरम्यान हल्ल्यामुळे तरुणाच्या तोंडावर आणि पाठीवर गंभीर जखम झाली. सध्या त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सध्या विश्रांतीबाग पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहे. नुकत्याच घडलेल्या गोळीबार आणि अॅसिड हल्ल्याच्या या घटनेने पुणे आणि आजूबाजूचा परिसर हादरला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI