सलून कर्मचाऱ्यावर चाकूहल्ला, अभिनेता अभिमन्यूला बेड्या

मुंबई : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता अभिमन्यू चौधरी याला मुंबईतील ओशिवारा पोलिसांनी अटक केली आहे. सलूनमधील कर्मचाऱ्यावर चाकू हल्ला केल्याचा अभिनेता अभिमन्यू चौधरी आणि त्याच्या मित्रावर आरोप आहे. पोलिसांनी घटनास्थळावरुनच अभिमन्यू आणि त्याच्या मित्राला बेड्या ठोकल्या. ‘मनोहिनी’ मालिकेत खलनायक आणि ‘शमिताभ’ सिनेमातील भूमिकेमुळे अभिनेता अभिमन्यू चौधरी चर्चेत आला होता. सलूनमधील कर्मचाऱ्याने महिलेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श […]

सलून कर्मचाऱ्यावर चाकूहल्ला, अभिनेता अभिमन्यूला बेड्या
Follow us
| Updated on: May 27, 2019 | 10:11 AM

मुंबई : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता अभिमन्यू चौधरी याला मुंबईतील ओशिवारा पोलिसांनी अटक केली आहे. सलूनमधील कर्मचाऱ्यावर चाकू हल्ला केल्याचा अभिनेता अभिमन्यू चौधरी आणि त्याच्या मित्रावर आरोप आहे. पोलिसांनी घटनास्थळावरुनच अभिमन्यू आणि त्याच्या मित्राला बेड्या ठोकल्या.

‘मनोहिनी’ मालिकेत खलनायक आणि ‘शमिताभ’ सिनेमातील भूमिकेमुळे अभिनेता अभिमन्यू चौधरी चर्चेत आला होता.

सलूनमधील कर्मचाऱ्याने महिलेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप आहे. त्यानंतर पीडित महिलेने अभिनेता अभिमन्यू चौधरी आणि त्याच्या मित्राला फोन करुन बोलावलं. अभिमन्यू आणि त्याचा मित्र सलूनमध्ये पोहोचल्यानंतर बाचाबाची झाली आणि त्यातूनच अभिमन्यूने सलूनमधील कर्मचाऱ्यावर चाकूने हल्ला केला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

अभिनेता अभिमन्यू चौधरी आणि त्याच्या मित्रावर आयपीसी कलम 354, 324 आणि 326 अन्वये गुन्हा नोंदवून, त्यांना अटक करण्यात आली.

सलूनमध्ये घडलेली संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, या घटनेच्या चार दिवसांनंतर पीडित महिलेने सलूनमधील कर्मचाऱ्याविरोधात पोलिसात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी सलून कर्मचऱ्याविरोधात आयपीसी कलम 354 अन्वये तक्रार नोंदवून घेतली आहे.

सलूनमधील कर्मचारी अभिमन्यू आणि त्याच्या मित्राच्या हल्ल्यात जखमी झाला असून, त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.