3600 कोटींच्या मालकासोबत अभिनेत्री एमी जॅक्सन विवाहबंधनात अडकणार!

मुंबई : थलैवा रजनीकांची हिरोईन एमी जॅक्सन हिने वर्षाच्या पहिल्याच दिवशी साखरपुडा केला. एमीने 1 जानेवारीला बॉयफ्रेंड जॉर्ज पनइओतूशी (George Panayiuotou) साखरपुडा केला. तिने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करत याची माहिती दिली. एमीचा होणारा नवरा हा अरबपती असल्याची माहिती आहे. तो ब्रिटेनच्या सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक आहे. लंडनमध्ये त्याचे हिल्टन, पार्क प्लाटा आणि डबल ट्री […]

3600 कोटींच्या मालकासोबत अभिनेत्री एमी जॅक्सन विवाहबंधनात अडकणार!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:44 PM

मुंबई : थलैवा रजनीकांची हिरोईन एमी जॅक्सन हिने वर्षाच्या पहिल्याच दिवशी साखरपुडा केला. एमीने 1 जानेवारीला बॉयफ्रेंड जॉर्ज पनइओतूशी (George Panayiuotou) साखरपुडा केला. तिने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करत याची माहिती दिली. एमीचा होणारा नवरा हा अरबपती असल्याची माहिती आहे. तो ब्रिटेनच्या सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक आहे. लंडनमध्ये त्याचे हिल्टन, पार्क प्लाटा आणि डबल ट्री सारखे मोठे होटेल आहेत.

जॉर्ज पनइओतू हा अॅबिलिटी समुहाचे संस्थापक आणि ब्रिटीश प्रॉपर्टी डेव्हलपर एंड्रस पनइओतू यांचा मुलगा आहे. त्यांच्या लग्झरी होटेल्स चेनचा व्यवसाय आहे. चार भावा-बहिणींपैकी जॉर्ज हा एक. तो त्याच्या वडिलांच्या म्हणजेच एंड्रस पनइओतू यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा आहे. त्याला एक भाऊ आणि तीन सावत्र बहिणी आहेत. 16 वर्षांच्या वयातच जॉर्जने आपल्या वडिलांचा अॅबिलिटी समुह सांभाळला. त्याचे वडील एंड्रस पनइओतू हे 3 हजार 600 कोटीचे मालक आहेत.

जॉर्जला तुरुंगवासही भोगावा लागला आहे. त्याने त्याच्या भावासोबत दोन पोलिसांवर हल्ला केला होता. या प्रकरणी त्याला दंड आणि सहा महिन्यांचा तुरुंगवास झाला होता. इतकेचं नाही तर याप्रकरणी त्याला 18 महिन्यांसाठी निलंबितही करण्यात आले होते.

एमीच्या अगोदर जॉर्ज प्रसिद्ध मॉडेल डेनियल लॉयडला डेट करत होता. 2014 साली हे त्यांच्यातील नात्यासाठी चर्चेचा विषय ठरले होते. तर एमी अभिनेता प्रतिक बब्बरसोबत रिलेशनशिपमध्ये होती. ती 2015 पासून जॉर्जला डेट करत आहे.

याआधीएमी जॅक्सन अक्षय कुमार आणि रजनीकांतसोबत सिनेमा 2.0 मध्ये दिसली होती. यात तिने एका रोबोटची भूमिका निभावली होती.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.