Sharad Kelkar | आधी अजयचा ‘तान्हाजी’, आता अक्षयच्या ‘लक्ष्मी’तही मराठमोळ्या अभिनेत्याची चर्चा!

चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर शरद केळकर या मराठमोळ्या अभिनेत्याची चर्चा सुरू झाली आहे.

Sharad Kelkar | आधी अजयचा ‘तान्हाजी’, आता अक्षयच्या ‘लक्ष्मी’तही मराठमोळ्या अभिनेत्याची चर्चा!
Follow us
| Updated on: Nov 11, 2020 | 4:36 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार अभिनित ‘लक्ष्मी’ (Laxmii) चित्रपट सोमवारी (9 नोव्हेंबर) डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅवर रिलीज झाला. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी चित्रपटाविषयी बरीच चर्चा रंगली होती. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी बरीच उत्सुकता निर्माण झाली होती. चित्रपटाच्या रिलीजनंतर आता प्रेक्षकांचा प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत आहे. मात्र, अक्षय कुमारच्या भूमिकेपेक्षा या चित्रपटात शरद केळकरच्या (Actor Sharad Kelkar) अभिनयाचे कौतुक होत आहे (Actor Sharad Kelkar wins Fans Heart in Laxmii Film).

‘लक्ष्मी’ या चित्रपटात शरद केळकर यांची खूप छोटी भूमिका आहे. पण, या 15 मिनिटांच्या लहानशा भूमिकेतही त्याची कामगिरी चाहत्यांना खूप आवडली आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर शरद केळकर या मराठमोळ्या अभिनेत्याची चर्चा सुरू झाली आहे. चित्रपटात एक लहानशी भूमिका असूनही या अभिनेत्याने बरीच प्रशंसा मिळवली आहे.

प्रेक्षकांसाठी सरप्राईज

अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी’ चित्रपटात तो ट्रान्सजेंडर व्यक्तिरेखा हे साकारतोय सर्वांनाच माहित होते. परंतु, शरदच्या या अनपेक्षित सरप्राईजने रसिक सुखावून गेले आहेत. खरे तर ‘लक्ष्मी’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये शरद कुठेच दिसला नव्हता. पण शरद केळकरची भूमिका मात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडली असल्याचे सध्या दिसत आहे. अनेकांनी ट्विटरवर शरद केळकरच्या ‘लक्ष्मी’ या भूमिकेतील फोटो शेअर करत त्याच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. अजय देवगणच्या ‘तान्हाजी’ चित्रपटात ‘छत्रपती शिवाजी महाराज’ साकारल्यानंतर पुन्हा एकदा एका आव्हानात्मक भूमिकेतून शरद केळकर भाव खाऊन गेला आहे (Actor Sharad Kelkar wins Fans Heart in Laxmii Film).

लवकरच पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

‘लक्ष्मी’नंतर अभिनेता शरद केळकर आणखी 4 चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अजय देवगणच्या आगामी ‘भुज : द प्राईड ऑफ इंडिया’ या चित्रपटात शरद महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या व्यतिरिक्त ‘अवैध’ नावाच्या चित्रपटात तो फुटबॉल प्रशिक्षक साकारणार आहे. शहीद कपूरसह ‘जर्सी’ या चित्रपटातही शरद केळकर झळकणार आहे. या हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त ‘अल्यान’ या तमिळ चित्रपटातून शरद केळकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

चित्रपटामागे वादांचे शुक्लकाष्ट

दाक्षिणात्य सुपरस्टार राघव लॉरेन्स दिग्दर्शित लक्ष्मी हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीपासून सातत्याने चर्चेत आला होता. या चित्रपटाला अनेक संकटाचादेखील सामना करावा लागला. या चित्रपटावर लव्हजिहाद, धार्मिक भावना दुखावणे असे अनेक आरोप करण्यात आले होते. त्यासोबतच या चित्रपटाच्या नावावरदेखील आक्षेप घेण्यात आला होता. त्यामुळे ‘लक्ष्मी बॉम्ब’ हे नाव बदलून ‘लक्ष्मी’ हे नवीन नाव ठेवण्यात आले होते.

(Actor Sharad Kelkar wins Fans Heart in Laxmii Film)

Non Stop LIVE Update
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.