अफझल गुरु ‘बळीचा बकरा’, आलिया भटची आई सोनी राजदान यांच्या दाव्याने खळबळ

अफजल गुरुला 'बळीचा बकरा' का बनवला गेला, याची सखोल चौकशी होण्याची गरज आहे, असं ट्वीट सोनी राजदान यांनी केलं आहे.

अफझल गुरु 'बळीचा बकरा', आलिया भटची आई सोनी राजदान यांच्या दाव्याने खळबळ
Follow us
| Updated on: Jan 21, 2020 | 1:39 PM

मुंबई : संसदेवरील हल्ला प्रकरणातील दोषी अफझल गुरु याला ‘बळीचा बकरा’ बनवण्यात आला, असा आरोप प्रख्यात बॉलिवूड अभिनेत्री सोनी राजदान यांनी केला आहे. जम्मू काश्मीरचे निलंबित पोलिस उपअधीक्षक दविंदर सिंह यांच्या अटकेनंतर सोनी राजदान आणि त्यांचे पती-निर्माते महेश भट्ट यांनी ट्वीट करत आक्षेप (Soni Razdan on Afzal Guru) घेतला आहे.

‘ही न्यायाची खिल्ली उडवली गेली आहे. एखादा माणूस निर्दोष सिद्ध झाला, तर त्याचा जीव परत कसा आणणार? म्हणूनच मृत्यूदंड इतक्या सहजतेने वापरला जाऊ नये. अफजल गुरुला ‘बळीचा बकरा’ का बनवला गेला, याचीही सखोल चौकशी होण्याची गरज आहे’ असं ट्वीट सोनी राजदान यांनी केलं आहे.

‘अफझल गुरुच्या फाशीनंतर दविंदर सिंहला का सोडण्यात आले, याची चौकशी झाली पाहिजे. अफझलसारख्या लोकांवर कसा अत्याचार केला जातो आणि गुन्हेगारांसाठी दहशतवादी कारवाया करण्यास भाग पाडले जाते आणि मग त्यांना फाशीची शिक्षा कशी मिळते, याचीही चौकशी व्हायला हवी!’ असंही सोनी राजदान यांनी लिहिलं आहे.

दोघा ‘वाँटेड’ दहशतवाद्यांसोबत सापडल्याने दविंदर सिंह यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. अफझल गुरुने तिहार तुरुंगातून वकील सुशील कुमारला लिहिलेल्या पत्रात दविंदर सिंह यांचा उल्लेख होता.

सोनी राजदान यांनी अफझल गुरुच्या पत्राचा काही भाग शेअर केला आहे. डीवायएसपी दविंदर सिंह यांनी माझा छळ केला होता आणि त्याच्यासाठी मला एक छोटंसं काम करावं लागेल, असं अफझल गुरुने सांगितल्याचा पत्रात उल्लेख आहे.

अफझल गुरुला 9 फेब्रुवारी 2013 रोजी फाशीची शिक्षा देण्यात आली होती. डिसेंबर 2001 मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अफझल गुरु दोषी आढळला होता.

कोण आहेत सोनी राजदान?

सोनी राजदान या ऐंशीच्या दशकातील गाजलेल्या अभिनेत्री. राजदान यांचा जन्म यूकेमध्ये झाला. त्यांची आई जर्मन, तर वडील नरेंद्र नाथ राजदान हे काश्मिरी पंडित होते. त्यांनी 36 चौरंगी लेन, आहिस्ता आहिस्ता, मंडी, डॅडी, सडक, सर, पेज 3 यासारख्या अनेक चित्रपटात काम केलं आहे.

1986 मध्ये त्यांनी दिग्दर्शक-निर्माते महेश भट्ट यांच्याशी विवाह केला. त्या महेश भट्ट यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. अभिनेत्री आलिया भट्ट ही त्यांची कन्या. नुकतंच दोघींनी ‘राझी’ चित्रपटात एकत्र भूमिका केली होती.

Soni Razdan on Afzal Guru

Non Stop LIVE Update
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.