चोर पाहिजेत! ताशी 4500 रुपये पगार, जाहिरातीने खळबळ

चोर पाहिजेत! ताशी 4500 रुपये पगार, जाहिरातीने खळबळ

मुंबई : तुम्ही आतापर्यंत बीएमसी, राज्य सरकार, केंद्र सरकार किंवा रेल्वे भरतीबाबत ऐकलं असेल. अनेकांनी प्रयत्नही केला असेल. पण कधी तुम्ही चोरांच्या भरतीबद्दल ऐकलंय का? होय आता जी बातमी तुम्ही वाचणार आहात, ती जरा हटके आहे. कारण एका ठिकाणी चक्क चोरांसाठी नोकरीच्या जागा निघाल्या आहेत.

चोरीसाठी चोरांना तासाला 4 हजार 500 रुपये इतकं मानधन देण्यात येणार आहे. दुकानात साड्या चोरणाऱ्या, ज्वेलरी चोरणाऱ्या या महिलांना तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. या सगळ्या महिलांचं कृष्णकृत्य सीसीटीव्हीत कैद आहे. तर सीसीटीव्हीतच कैद या चोराट्यांनाही तुम्ही अनेकदा पाहिलं असेल.

एक वेबसाईटवर चोरांसाठीच्या भरतीची ही जाहिरात देण्यात आली आहे. एका दुकानासाठी चोरांची ही भरती निघाली आहे. बार्क डॉट कॉम या वेबसाईटवरुन ही भरती केली जाते आहे.

तुम्हाला चोरांच्या भरतीचं हे प्रकरण वाचून धक्का तर नक्कीच बसला असेल, आता नेमकं प्रकरण काय आहे, ते वाचा. घटना लंडनमध्ये घडली आहे. इथल्या एका कपड्याच्या दुकानात गेल्या एक वर्षांपासून चोरटे चोरी करुन पसार होत आहेत. पोलिसही त्यांना शोधू शकले नाहीत. त्यामुळे दुकान मालकाने बार्क डॉट कॉमवर चक्क या चोरट्यांना नोकरीची ऑफर दिली आहे. नेमकं ते चोरी कशी करतात, कुठून पळतात, हेच या मालकाला जाणून घ्यायचं आहे. चोरांसाठी नोकरीची ही जाहीरात सध्या जगभरात व्हायरल होतेय आणि प्रत्येकजण हेच म्हणतोय, की काय दिवस आलेत.

पाहा व्हिडीओ :

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI