मुंबईकरांच्या खिशाला कात्री, कांदा, बटाटानंतर आता चहा महागणार!

मुंबईकरांच्या खिशाला कात्री, कांदा, बटाटानंतर आता चहा महागणार!

पेट्रोल, कांदे, बटाटे आणि टोमॅटोनंतर आता तुमचा चहाही महागणार आहे. तुमच्या आवडत्या चहासाठी तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

Nupur Chilkulwar

| Edited By: Namrata Patil

Dec 20, 2019 | 11:58 PM

मुंबई : पेट्रोल, कांदे, बटाटे आणि टोमॅटोनंतर आता तुमचा चहा ही महागणार आहे. तुमच्या आवडत्या चहासाठी तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. चहा आणि कॉफी असोसिएशन (टीसीए), जे मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) मध्ये 5000 हून अधिक चहा आणि कॉफी विक्रेत्यांचे प्रतिनिधित्व करते, त्यांनी आपल्या सदस्यांना कपच्या किंमतीत 1 रुपयांची वाढ करून 2 रुपयांपर्यंत वाढ करण्यास सांगितले आहे (Tea Price Increases).

दिवसभरात काम करत असलेले मुंबईकर दिवसाला सरासरी चार ते पाच कप चहा घेतात. चहाच्या दरात वाढ झाल्यानंतर मुंबईकरांचा चहाचा खर्च दिवसाला 5 ते 10 रुपयांनी वाढणार आहे (Tea Price Increases).वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, अन्नधान्याच्या महागाईचा जर नोव्हेंबरमध्ये 11.8 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. ऑक्टोबरच्या तुलनेत ही वाढ 2 टक्क्यांनी वाढली आहे.

चहा आणि कॉफी असोसिएशनच्या मते, दूध, साखर, चहाची पाने आणि एलपीजीच्या किमतींमध्ये वाढ झाल्यामुळे विक्रेत्यांचा नफा कमी होऊ लागला. म्हणून असोसिएशनकडून विक्रेत्यांना दरवाढीचा सल्ला देण्यात आला. असोसिएशनचा सल्ला आपल्या सदस्यांना बंधनकारक नसतानाही, त्याकडे गांभीर्याने पाहिले जाण्याची शक्यता आहे. चार वर्षांपासून अस्तित्वात असलेला टीसीए चहा विक्रेत्यांना वित्तपुरवठा, स्वच्छता आणि ग्राहक इंटरफेसचा सल्ला देत आहे.

रस्त्याच्या कडेला असलेला चहा विक्रेता सरासरी 6 रुपये किंवा 7 रुपये प्रति कटिंग चहा विकतो. एका पूर्ण कपची किंमत अगदी दुप्पट आहे, म्हणजेच 12 किंवा 14 रुपये. चहाच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर एका कटिंग चहाची किंमत 7 किंवा 8 रुपये आणि पूर्ण कपची किंमत 14 किंवा 15 रुपये इतकी होईल.

चहा विक्रेता दिवसाला सरासरी सुमारे 500 कप विकतो. येवले चहा, प्रेमाचा चहा आणि सई अमृततूल्य चहा यांच्यासह काही ब्रांडेड चहा विक्रेते आधीपासून 10 रुपये कप (कटिंग) किंवा त्याहून अधिक किंमतीला चहा विकत आहेत. त्यामुळे आता चहा आणि कॉफी असोसिएशनच्या या सल्ल्यानंतर चहा विक्रेत्यांचा नफा वाढणार असला तरी सामान्य मुंबईकरांच्या खिशाला मात्र कात्री लागणार आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें