दलित, मुस्लिम, जाटनंतर हनुमान आता ‘ठाकूर’ आणि ‘शेतकरी’

दलित, मुस्लिम, जाटनंतर हनुमान आता 'ठाकूर' आणि 'शेतकरी'

मुंबई : हनुमानाच्या जातीवरुन गेले काही दिवस राजकीय नेत्यांमध्ये चांगलाच वाद सुरु आहे. दलित, मुसलमान, आदिवासी, गुलाम आणि जाटच्या नंतर आता ठाकूर आणि शेतकरी असल्याचा दावा काही राजकीय मंडळीनी केला आहे. यूपी सरकारमधील मंत्री रघुराज सिंह यांनी हनुमान ठाकूर होता असे सांगितले आहे, तर लोकदल पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील सिंह यांनी हनुमान शेतकरी असल्याचा दावा […]

सचिन पाटील

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:48 PM

मुंबई : हनुमानाच्या जातीवरुन गेले काही दिवस राजकीय नेत्यांमध्ये चांगलाच वाद सुरु आहे. दलित, मुसलमान, आदिवासी, गुलाम आणि जाटच्या नंतर आता ठाकूर आणि शेतकरी असल्याचा दावा काही राजकीय मंडळीनी केला आहे. यूपी सरकारमधील मंत्री रघुराज सिंह यांनी हनुमान ठाकूर होता असे सांगितले आहे, तर लोकदल पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील सिंह यांनी हनुमान शेतकरी असल्याचा दावा केला आहे.

हनुमानाच्या जातीवरुन सध्या राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे, तर हनुमान भक्तांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे हनुमान यांच्या जातीवरुन वाद सुरु असताना दुसरीकडे मथुरामध्ये रघुराज सिंह यांनी नवीन शोध लावत सांगितले की, राम आणि कृष्ण हे ठाकूर समाजाचे होते आणि हनुमानही ठाकूर होता, तसेच ते म्हटले जे त्याग, तपस्या आणि बलिदान करतात ते ठाकुर असतात.

राजस्थान विधानसभा प्रचारा दरम्यान यूपीचे मुख्यमंत्री योगी यांनी हुनमान दलित होते असे सांगितेल होते. तेव्हापासून हनुमानाच्या जातीवरुन चांगलाच वाद देशभरात सुरु झाला आहे. लोकदलचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील सिंह यांनी अलीगडमध्ये माध्यमांशी बोलताना हनुमान शेतकरी होते म्हणून त्यांनी रावणासोबत लढाई केली. तसेच ते पुढे म्हणाले आजच्या हनुमानांना अंबानी आणि अदानीसारख्या उद्योगपतीसोंबत लढावे लागणार आहे.

युपी सरकारमधील मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी यांनी मागे हनुमान जाट असल्याचे सांगितले होते. ते म्हटले होते जो दुसऱ्यांच्यामध्ये आडवा येतो तो जाट समाजाचा असतो. तर याआधी भाजपचे विधानपरिषदेचे सदस्य बुक्कल नवाब यांनी हनुमान मुसलमान होता असे सांगितले होते.

राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगचे अध्यक्ष नंद कुमार साय यांनी हनुमान आदिवासी असल्याचा दावा केला होता. त्यांनी सांगितले की, आदिवासींच्यामध्ये हनुमान एक गोत्र होते. तर दुसरीकडे भाजपचा राजीनामा दिलेल्या खासदार सावित्रीबाई फुलेंनी मागे हनुमान मनुवादी लोकांचे गुलाम होते असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले होते.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें