अफजल गुरुचा मुलगा म्हणतो, मला अभिमान आहे, वडिलांचं स्वप्न पूर्ण करणार!

बारामुल्ला : भारताच्या संसदेवर हल्ला केलेल्या दहशतवादी अफजल गुरुचा मुलगा गालिबने दहावी आणि बारावी परीक्षेत उत्तम कामगिरी करुन सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. आता त्याने डॉक्टर बनण्याची इच्छा व्यक्त केलीआहे. सध्या तो 5 मार्चला होणाऱ्या मेडिकल प्रवेश परीक्षेसाठी (NEET)  तयारी करत आहे.  पुढील शिक्षणासाठी तो परदेशातही जाणार आहे. नुकतेच गालिबला भारतीय आधार कार्ड मिळाले आहे. […]

अफजल गुरुचा मुलगा म्हणतो, मला अभिमान आहे, वडिलांचं स्वप्न पूर्ण करणार!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

बारामुल्ला : भारताच्या संसदेवर हल्ला केलेल्या दहशतवादी अफजल गुरुचा मुलगा गालिबने दहावी आणि बारावी परीक्षेत उत्तम कामगिरी करुन सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. आता त्याने डॉक्टर बनण्याची इच्छा व्यक्त केलीआहे. सध्या तो 5 मार्चला होणाऱ्या मेडिकल प्रवेश परीक्षेसाठी (NEET)  तयारी करत आहे.  पुढील शिक्षणासाठी तो परदेशातही जाणार आहे. नुकतेच गालिबला भारतीय आधार कार्ड मिळाले आहे. आधार कार्ड मिळाल्याने त्याने आनंद व्यक्त केला.

गालिब पुढील शिक्षणासाठी परदेशात जाणार आहे. यासाठी त्याच्याकडे ओळखपत्र असणे गरजेचे होतं. मात्र त्याला आता भारत सरकारकडून आयकार्ड मिळालेले आहे. यामुळे तो पासपोर्टसाठी अर्ज करु शकतो. यामुळेच गालिबने आधार कार्डसोबत फोटो काढून त्याने आपला आनंद व्यक्त केला आहे.

आता लवकरच मला माझा पासपोर्ट मिळूदे अशी इच्छा गालिबने व्यक्त केली आहे. “मला माझा पासपोर्ट मिळेल तेव्हा मला सर्वात जास्त अभिमान वाटेल.” असे गालिब म्हणाला.

जर मी नीट परिक्षेत उत्तीर्ण झालो नाही, तर मी परदेशात जाणार. तुर्कीच्या एका महाविद्यालयात मला स्कॉलरशीप मिळेल अशी मला अपेक्षा आहे, असेही गालिबने सांगितले.

गालिब आणि त्याची आई तबस्सुम त्याचे आजोबा गुलाम मोहम्मद यांच्यासोबत राहतात.

वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार: गालिब

गालिबच्या वडिलांना म्हणजेच अफजल गुरुला मेडिकल क्षेत्रात करिअर करायचे होते. मात्र ते स्वप्न पूर्ण न झाल्याने मी माझ्या वडलांचे स्वप्न पूर्ण करणार असल्याचे त्याने म्हटले आहे.

अफजल गुरुला फाशी दिल्यानंतर काश्मीर खोऱ्यातील दहशतवादी संघटनांनी गालिबचे माइंड वॉश करण्यासाठी आणि आपल्या वडिलांचा बदला घेण्यासाठी नेहमी उकसवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो दहशतवाद्यांचा जाळ्यात फसला नाही. याचे सर्व क्रेडिट तो आपल्या आईला देतो.

गालिबचे वडील अफजल गुरुने 2001 मध्ये लोकसभेवर हल्ला केल्याप्रकरणी त्याला फाशी ठोठावण्यात आली होती. यानंतर दहशतवादी संघटनांनी अफजलच्या फाशीचा बदला घेण्यासाठी काश्मीर खोऱ्यातील तरुणांचे ब्रेन वॉश करण्याचा प्रयत्न केला होता.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.