अहमदनगर-पुणे महामार्गावर बस-ट्रकची समोरासमोर धडक, तिघांचा मृत्यू, 25 जखमी

अहमदनगर-पुणे महामार्गावर बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात (Ahmadnagar-pune highway accident). अपघातात तिघांचा मृत्यू झाला. तर 22 ते 25 जण जखमी झाल्याची माहिती आहे.

अहमदनगर-पुणे महामार्गावर बस-ट्रकची समोरासमोर धडक, तिघांचा मृत्यू, 25 जखमी

अहमदनगर : अहमदनगर-पुणे महामार्गावर बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात (Ahmadnagar-pune highway accident). अपघातात तिघांचा मृत्यू झाला. तर 22 ते 25 जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. जखमींना अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेतली. हा अपघात नेमका कसा झाला याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.

नगर-पुणे महामार्गावर केडगाव उड्डाणपूल येथे हा भीषण अपघात झाला. ही बस अहमदनगरहून पुण्याला जात होती, तर ट्रक पुण्याहून अहमदनगरकडे जात होती. केडगाव उड्डाणपुलावर सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान या बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये बसचा अक्षरश: चुराडा झाला.

अपघातात बसमधील 22 – 25 जण गंभीर जखमी झाले आहेत तर तिघांना आपला जीव गमवावा लागला आहे. अपघातानंतर जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Published On - 11:05 pm, Thu, 26 December 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI