वाहतूक दंडाचा नवा विक्रम, वाहतूक पोलिसांचा पॉर्श कारला 9.8 लाखांचा दंड

गुजरातमध्ये एका चारचाकी वाहनाने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन (Ahmedabad traffic police action on prosche car) केल्यामुळे ट्रॅफिक पोलिसांनी वाहनावर तब्बल 9.80 लाख रुपयांचा दंड आकारला.

वाहतूक दंडाचा नवा विक्रम, वाहतूक पोलिसांचा पॉर्श कारला 9.8 लाखांचा दंड

अहमदाबाद : गुजरातमध्ये एका चारचाकी वाहनाने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन (Ahmedabad traffic police action on prosche car) केल्यामुळे ट्रॅफिक पोलिसांनी वाहनावर तब्बल 9.80 लाख रुपयांचा दंड आकारला. या कारच्या चालकाकडे वैध कागदपत्र आणि नंबर प्लेट नसल्यामुळे अहमदाबाद परिवहन कार्यालयाने पॉर्श 911 स्पोर्ट्स (Ahmedabad traffic police action on prosche car) कारला हा दंड आकारला आहे.

पोलिसांनी कार ताब्यात घेतली आहे. कारचे वैध कागदपत्र आणि नंबर प्लेट नसल्यामुळे कारवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या पॉर्श 911 कारची किंमत अंदाजे दोन कोटी रुपये आहे, अशी माहिती अहमदाबाद पोलिसांनी ट्विटरवर दिली.

“नंबर प्लेट नसल्यामुळे अहमदाबादमधील हेलमेट चौकात ट्रॅफिक पोलिसांनी सिल्वर रंगाच्या कारला आडवले. चौकशी केली असता कार चालक वाहनाचे वैध कागदपत्र दाखवण्यात अयशस्वी ठरला, त्यामुळे त्याला ताब्यात घेतले”, असं पोलीस आयुक्त तेजस पटेल यांनी सांगितले.

पटेल म्हणाले, “मोटर वाहन कायद्यानुसार परिवहन कार्यालयाने कारवाई केली आहे. त्यामुळे आता कारच्या मालकाला दंड भरावा लागेल त्यानंतर त्याला कार दिली जाईल”.

ट्रक चालकावर 6.5 लाखांचा दंड

दरम्यान, काही दिवसांपूर्वी ओडिशाच्या संबलपूरमध्ये वाहन नियम तोडल्यामुळे नागालँडच्या एका ट्रक मालकावर 6 लाख 53 हजार 100 रुपयांचा दंड आकारला होता. ओडिशा परिवहन विभागाने ही कारवाई केली होती. एकूण सात नियम तोडल्याप्रकरणी हा दंड आकारला होता.

ट्रक मालक शैलेश शंकर लाल गुप्ता गेल्या पाच वर्षांपासून टॅक्स भरत नव्हते. त्यासोबतच त्यांनी ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन केले होते. त्यामुळे त्यांच्यावर ही मोठी कारवाई केली होती.

Published On - 7:30 pm, Sat, 30 November 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI