Bihar Election Result : ‘न्यायाची लढाई सुरु राहील’, एमआयएमची दोन जागांवर बाजी

बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आता समोर येऊ लागला आहे. या निवडणुकीत एमआयएम पक्षाला दोन जागांवर यश मिळालं आहे (AIMIM win two seats in Bihar Assembly Election 2020).

Bihar Election Result : 'न्यायाची लढाई सुरु राहील', एमआयएमची दोन जागांवर बाजी
चेतन पाटील

|

Nov 10, 2020 | 9:43 PM

पाटणा : “सीमांचलच्या नागरिकांचं मनापासून आभार मानतो. बिहारमध्ये आम्ही जेव्हा आमच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली तेव्हापासून सांगत आलो आहोत की, आम्ही सीमांचलच्या नागरिकांना न्याय देणार. गेल्या 60 वर्षात सीमांचलच्या नागरिकांना योग्य न्याय मिळाला नाही. हा प्रांत फक्त बिहारच नाही तर संपूर्ण भारतातील सर्वाधिक अविकसित भाग आहे. न्यायाची लढाई सुरु राहील. आम्ही तिथे शाळा, महाविद्यालय, चांगले रुग्णालय उभारणार”, अशी प्रतिक्रिया एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी दिली (AIMIM win two seats in Bihar Assembly Election 2020).

बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आता समोर येऊ लागला आहे. या निवडणुकीत एमआयएम पक्षाला दोन जागांवर यश आलं आहे. तर तीन जागांवर एमआयएम आघाडीवर आहे. याच पार्श्वभूमीवर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी बिहारच्या जनतेचं आणि मित्र पक्षांचे आभार मानले. त्याचबरोबर बिहारमध्ये निवडणुकीच्या प्रचारासाठी गेलेले हैदराबाद, बिहार आणि महाराष्ट्रातील एमआयएमच्या नेत्यांचे आभार मानले (AIMIM win two seats in Bihar Assembly Election 2020).

‘या’ जागांवर एमआयएमची बाजी

बिहारच्या अमौर आणि कौचाधामन या दोन मतदारसंघांमध्ये एमआयएमचे उमेदवार जिंकले आहेत. अमौर मतदारसंघात एमआयएमचे उमेदवार अख्तरुल इमान यांना तब्बल 85 हजार 391 मतं मिळाली आहेत. तर कौचाधामन मतदारसंघात मोहम्मद इजहर अस्फी यांना 79 हजार 548 मतं मिळाली आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत (Bihar Assembly election 2020) एमआयएम पक्षाने 20 मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार उभे केले आहेत. विशेष म्हणजे मुस्लिम मतदार सर्वाधिक असणाऱ्या सीमांचल प्रांतात एमआयएमने आपले 14 उमेदवार उभे केले होते.

विशेष म्हणजे 2015 च्या विधानसभा निवडणुकीत सीमांचल प्रांतात काँग्रेसला सर्वाधिक जागांवर यश मिळालं होतं. काँग्रेसने या प्रांतात 9 जागांवर विजय मिळवला होता. त्यानंतर जेडीयूने 6 तर आरजेडीने 3 जागांवर विजय मिळवला होता. भाजपने या प्रांतात 6 तर भाकपाला 1 जागेवर समाधान मानावं लागलं होतं.

एमआयएमने 2015 च्या विधानसभा निवडणुकीत सीमांचल प्रांतात 6 जागांवर निवडणूक लढवली होती. त्यावेळी एमआयएमच्या हाती फारसं यश आलं नव्हतं. पण कोचाधामन मतदारसंघात एमआयएमचे उमेदवार अख्तरुल इमान दुसऱ्या नंबरवर होते.

दरम्यान, 2019 साली किशनगंज येथे झालेल्या पोटनिवडणुकीत एमआयएमने जोर लावला होता. अखेर त्या पोटनिवडणुकीत आपलं खातं खोलण्यात एमआयएमला यश आलं होतं. सध्या सीमांचल प्रांतात भाजपचे उमेदवार आघाडीवर दिसत आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकार काँग्रेस तर तिसऱ्या क्रमांकावर एमआयएमचे उमेदार आघाडीवर दिसत आहेत.

संबंधित बातमी : ओवेसी फॅक्टरने समीकरणच बदलले, 11 जागांवर NDA ची घोडदौड

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें