‘मिस वर्ल्ड’ आईची हुशार लेक, आराध्या बच्चनचं लक्षवेधी भाषण

इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेल्या व्हिडीओतील भाषणात आराध्या बच्चन नारीशक्तीविषयी भाष्य करताना दिसते

'मिस वर्ल्ड' आईची हुशार लेक, आराध्या बच्चनचं लक्षवेधी भाषण
अनिश बेंद्रे

|

Dec 23, 2019 | 10:56 AM

मुंबई : माजी विश्वसुंदरी ऐश्वर्या राय-बच्चन हिने 25 वर्षांपूर्वी देश-विदेशातील दिग्गजांसमोर आपले विचार ठामपणे मांडत ‘मिस वर्ल्ड’चा किताब जिंकला होता. आता तिची लेक आराध्या बच्चनही आपले विचार ठणकावून सांगतानाचा व्हिडीओ (Aradhya bachchan speech video) समोर आला आहे.

चिमुरडी आराध्या नेहमी आपल्या आईसोबत फिरताना दिसत असल्याने तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं. ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन या दोघांनीही वेळोवेळी नेटिझन्सना यावरुन बजावलं आहे. इतर वेळी लाजरी-बुजरी वाटणारी आराध्या शाळेच्या वार्षिक समारंभात धीटपणे बोलताना दिसते.

आराध्याच्या इन्स्टाग्राम अकाऊण्टवरुन शेअर करण्यात आलेला व्हिडीओ पाहून अनेकांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. सर्वसामान्यांनी आराध्याच्या समाधीटपणाचं कौतुक केलं आहे.

भाषणात आराध्या नारीशक्तीविषयी भाष्य करताना दिसते. ‘मी एक कन्या आहे. मी स्वप्न आहे. नव्या पिढीचं स्वप्न. आपण एका नवीन जगात जागृत होऊया, जिथे मी सुरक्षित असेन, जिथे मला प्रेम मिळेल, सन्मान मिळेल. अशा जगात जिथे माझा आवाज उद्धटपणे दाबला जाणार नाही, उलट तो समजून घेतला जाईल. एक असं जग जिथे आपण आयुष्याच्या पुस्तकातून शिकू आणि माणूसकी जपू’ असं आराध्या म्हणते.

आराध्याचं भाषण संपताच संपूर्ण थिएटरमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. आराध्याचं भाषण फक्त ऐश्वर्या-अभिषेक, अमिताभ बच्चन यांनीच नाही, तर शाहरुख खाननेही मोबाइलमध्ये रेकॉर्ड केलं. सध्या सोशल मीडियावर आराध्याच्या या भाषणाचं भरभरुन कौतुक केलं जात आहे.

ऐश्वर्या राय-बच्चन हिने 1994 मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. 2007 मध्ये ऐश्वर्या अभिषेक बच्चनसोबत विवाहबंधनात अडकली. त्यांची मुलगी आराध्या (Aradhya bachchan speech video) आठ वर्षांची आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें