180 चौरस फुटाच्या घरात राहणाऱ्या पोलिसांना घरं देणार : अजित पवार

"पोलीस अवघ्या 180 स्क्वेअरफूटच्या घरात राहात आहेत. ते आपला कायदा आणि सुव्यवस्था बघतात. आपल्यासाठी 24 तास राबतात. त्यामुळे त्यांच्यासाठी मला काम करायचे आहे", असे अजित पवार म्हणाले. 

180 चौरस फुटाच्या घरात राहणाऱ्या पोलिसांना घरं देणार : अजित पवार
Follow us
| Updated on: Jan 10, 2020 | 4:45 PM

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या मंत्रीपदाचा भार स्वीकारल्यानंतर लगेच ते कामाला लागले आहेत. पोलिसांना चांगल्याप्रकारचे घरे उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यभरातील मुंबई, पुणे, पनवेल सारख्या इतर भागांमध्ये नवे प्रकल्प सुरु करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पुण्यात प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते (Ajit Pawar)Ajit .

“पोलीस अवघ्या 180 स्क्वेअरफूटच्या घरात राहात आहेत. ते आपला कायदा आणि सुव्यवस्था बघतात. आपल्यासाठी 24 तास राबतात. त्यामुळे त्यांच्यासाठी मला काम करायचे आहे”, असे अजित पवार म्हणाले.

“मेट्रो कामासाठी पैसे दिले गेलेले नाहीत. गेल्या सरकारने ते काम केले नाही. सर्व खात्यांना निधी द्यायचा आहे. कोणत्या खात्याला किती निधी द्यायचा? ते मी बघत आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला लागणारी रक्कम गृहित धरुन बाकीच्या कामांना कितपत निधी द्यायचा? याबाबत माझे कामकाज सुरु आहे. सध्या मी सर्व विभागांचा आढावा घेत आहे. याविषयावर चर्चा करतोय आणि अधिकाऱ्यांशी बोलत आहे. अधिकाऱ्यांचे याबाबत काय मत आहे? हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे”, असे अजित पवार म्हणाले.

अजित पवार यांच्यावर पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याबाबत त्यांना प्रश्न विचारला असता, “पुणे जिल्ह्यात 18 आमदार निवडले जातात. पुण्यातील पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात बरीच कामे आहेत. गेल्यावेळी पालकमंत्री असताना जसे कलेक्टर ऑफिस, सर्किट हाऊस, विभागीय कार्यालय केले तशाप्रकारच्या इमारती तालुक्याच्या ठिकाणी बांधायच्या राहिलेल्या असतील तर त्याही करण्याचा आमचा मानस आहे”, असे अजित पवार म्हणाले.

“अर्थविभागाची जबाबदारी असल्यामुळे संपूर्ण राज्याला विविध कामाकरता उपलब्ध निधीतून पैसे देऊन पुणे जिल्ह्याला कसे पैसे देता येतील? याचा प्रयत्न करेन. यासाठी मी पाठपुरावा सुरु ठेवणार”, असे देखील अजित पवार म्हणाले.

Non Stop LIVE Update
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.