अक्षय कुमार, दीपिका पदुकोण, आलिया भट्टला मतदानाचा हक्क नाही!

मुंबई: देशात विविध टप्प्यात मतदान होतय. मोठ मोठ्या सेलिब्रिटी मतदानाचं आवाहन करत आहेत. मात्र अक्षय कुमार, दीपिका पदुकोण आणि आलिया भट हे तिघेही भारतात मतदान करु शकणार नाहीत. कारण ते भारतीय नागरिक नाहीत. हे ऐकून तुम्हाला धक्का बसला ना ? पण हे खरं आहे. हे तिघेही आतापर्यंत आपल्याला देशभक्तीचं गुणगाण करताना दिसले. मग ते त्यांच्या […]

अक्षय कुमार, दीपिका पदुकोण, आलिया भट्टला मतदानाचा हक्क नाही!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM

मुंबई: देशात विविध टप्प्यात मतदान होतय. मोठ मोठ्या सेलिब्रिटी मतदानाचं आवाहन करत आहेत. मात्र अक्षय कुमार, दीपिका पदुकोण आणि आलिया भट हे तिघेही भारतात मतदान करु शकणार नाहीत. कारण ते भारतीय नागरिक नाहीत. हे ऐकून तुम्हाला धक्का बसला ना ? पण हे खरं आहे.

हे तिघेही आतापर्यंत आपल्याला देशभक्तीचं गुणगाण करताना दिसले. मग ते त्यांच्या सिनेमातून असो की त्यांच्या चित्रपटातून असो. मात्र या तिघांबाबत एक गोष्ट ऐकून तुम्हाला धक्का बसू शकतो. कारण हे तिघेही भारतात मतदान करू शकत नाहीत.  कारण या तिघांकडेही भारतीय पारपत्र नाही. म्हणजेच या तिघांकडेही भारताचे नागरिकत्व नाही.

आतापर्यंत खिलाडी अक्षय कुमारने बऱ्याच सिनेमामांमध्ये देशभक्तीपर भूमिका साकारल्या आहेत. पण अक्षय कुमार भारतात मतदान करु शकत नाही. कारण अक्षय कुमारकडे कॅनेडियन पासपोर्ट आहे. म्हणजेच त्याच्याकडे कॅनडाचं नागरिकत्व आहे. कॅनडाने त्याला मानद नागरिकत्व दिलं.

भारत सरकार 2 नागरिकत्वाची परवानगी देत नाही. त्यामुळे अक्षयने भारताचं नागरिकत्व सोडलं. अक्षयचा जन्म पंजाबमधील अमृतसरमध्ये झाला. तो लहानाचा मोठा दिल्लीत झाला. मार्शल आर्ट्स बँकॉकमध्ये शिकला.

या देशाने अक्षय कुमारला प्रेम दिलं, राष्ट्रीय पुरस्कार दिलेत, पैसा, प्रसिध्दी सगळं काही दिलं. तो सुध्दा अनेकदा देशभक्तीची भाषा करत आपल्याला मोहिनी घालत राहिला.

अक्षय देशासाठी, सैनिकांसाठी जरी आर्जव करत असला तरी त्याने भारतीयत्व का नाही स्वीकारलं, हा प्रश्न पडतो. त्याचसोबत दीपिका पादुकोण. तिच्याकडे भारताचं नागरिकत्व नाही. तिच्याकडेही परदेशी पासपोर्ट असल्याची बाब पुढे आली.

दीपिकाचा जन्म डेन्मार्कमधील कोपनहेगनमध्ये झाला. दीपिकाकडे डॅनिश पासपोर्ट आहे. तिला डेन्मार्कचं नागरिकत्व मिळालं. तर अभिनेत्री आलिया भटकडेही भारताचा पासपोर्ट नाही. आलिया भट ब्रिटीश नागरिक आहे. आई सोनी रझदानही ब्रिटीश नागरिक आहे.

केवळ हे तिघेच नाहीत तर कतरिना ब्रिटीश नागरिक आहे, जॅकलीन फर्नांडिसही श्रीलंकेची नागरिक आहे, नर्गिस फाकरीकडे अमेरिकन पासपोर्ट आहे. त्यामुळे हे कोणतेही सेलिब्रिटी भारतात मतदान करु शकणार नाहीत.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.