ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा लादेन ठार : अमेरिका मीडिया

अल कायदा या दहशतवादी संघटेनेचा म्होरक्या ओसामा बिन लादेननंतर आता हमजा बिन लादेनही ठार झाल्याचे वृत्त अमेरिकन मीडियाने  दिले आहे. अमेरिकेच्या गुप्त सूत्रांनी हमजाच्या मृत्यूची माहिती दिल्याचे अमेरिकन मीडियाने म्हटलं आहे.

ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा लादेन ठार : अमेरिका मीडिया
Follow us
| Updated on: Aug 01, 2019 | 8:28 AM

न्यूयॉर्क : अल कायदा(al qaeda) या दहशतवादी संघटेनेचा म्होरक्या ओसामा बिन लादेननंतर (osama bin laden) आता हमजा बिन लादेनही (Hamza Bin Laden) ठार झाल्याचे वृत्त अमेरिकन मीडियाने (american media report) दिले आहे. अमेरिकेच्या गुप्त सूत्रांनी हमजाच्या मृत्यूची माहिती दिल्याचे अमेरिकन मीडियाने म्हटलं आहे.

दरम्यान अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी हमजाचा मृत्यू नेमका कुठे झाला ते अद्याप स्पष्ट केलेलं नाही. तसेच हमजाच्या मृत्यूमागे अमेरिकेचा हात आहे की नाही याचीही अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प(Donald Trump) यांना याबाबत विचारणा करण्यात आल्यावर त्यांनी यावर उत्तर देण्यास टाळाटाळ केली.

हमजा बिन लादेनला 2018 मध्ये शेवटचा दिसला होता. मीडिया रिपोर्टनुसार, हमजा हा अल कायदा या दहशतवादी संघटेनेचा वारस म्हणून ओळखला जातो.

दरम्यान, लादेनचा मुलगा हमजा बिन लादेनची माहिती देणाऱ्याला अमेरिकेने 10 लाख डॉलर म्हणजेच जवळपास 7 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. हमजा बिन लादेन आपल्या बापाचा बदला घेण्यासाठी कोणत्यातरी मोठ्या हल्ल्याच्या तयारीत असल्याचा दावा अमेरिकेने केला होता. त्यामुळे अमेरिकेने इतक्या मोठ्या रकमेचं इनाम जाहीर केलं होतं.

लादेनचा खात्मा

अमेरिकेने 2011 मध्ये अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनला पाकिस्तानातील एबटाबादमध्ये घुसून ठार केलं होतं. लादेनने अमेरिकेत 9/11 ला हल्ला केला होता, यामध्ये जवळपास 3 हजार नागरिकांचा मृत्यू झाला होता.

हमजा लादेन

दरम्यान, लादेनचा मुलगा हमजाने काही दिवसांपूर्वीच लग्न केलं. 9/11 दहशतवादी हल्ल्यात विमान हायजॅक करणाऱ्या मोहम्मद अट्टाच्या मुलीशी हमजाने निकाह केला. ओसामाच्या सावत्र भावांनी इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये या लग्नाचा उल्लेख आहे. या बातमीनुसार, हमजाच्या पत्नीकडे इजिप्तचं नागरिकत्व आहे.

लादेनच्या खात्म्यानंतर त्याच्या पत्नी आणि मुली सौदी अरेबियाला गेले होते. तिथे माजी युवराज मोहम्मद बिन नायेफने आश्रय दिला होता. ओसामाच्या पत्नी आणि मुलांनी सातत्याने लादेनची आई आलिया घानेमशी संपर्क ठेवून होत्या.

संबंधित बातम्या : 

लादेनच्या मुलावर अमेरिकेचं इनाम, हमजा लादेन बदला घेण्याच्या तयारीत

Non Stop LIVE Update
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.