येत्या चार महिन्यांत अयोध्येत गगनचुंबी राम मंदिर : अमित शाह

काँग्रेस नेते आणि वकील कपिल सिब्बल कोर्टात म्हणायचे की आता अयोध्या खटला चालवू नका, भाऊ, तुमच्या पोटात का दुखत आहे? असा प्रश्न अमित शाह यांनी केला

येत्या चार महिन्यांत अयोध्येत गगनचुंबी राम मंदिर : अमित शाह

रांची : येत्या चार महिन्यांत अयोध्येत गगनचुंबी राम मंदिर बांधलं जाईल, असं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी दिलं. झारखंड विधानसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान पाकुडमध्ये सुरु असलेल्या रॅली शाहांनी याबाबत ग्वाही (Amit Shah Ram Mandir) दिली.

‘सुप्रीम कोर्टाने अयोध्या प्रश्नी आपला निर्णय दिला आहे. शंभर वर्षांपासून जगभरातील भारतीयांची मागणी होती, की राम जन्मभूमीवर भव्य राम मंदिर बांधलं जावं. पण हे काँग्रेस नेते आणि वकील कपिल सिब्बल कोर्टात म्हणायचे की आता खटला चालवू नका, भाऊ, तुमच्या पोटात का दुखत आहे?’

‘मला सांगायचे आहे की सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे, येत्या चार महिन्यांच्या आत अयोध्येत प्रभू श्रीराम यांचं मंदिर बनत आहे.’ असं अमित शाह यांनी सांगितलं.

अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने 9 नोव्हेंबरला ऐतिहासिक निर्णय दिला. अयोध्येतील ती वादग्रस्त जमीन ही रामलल्ला म्हणजे हिंदू पक्षांना बहाल करण्यात आली आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्त्वातील 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाने अयोध्येतील वादग्रस्त जागी राम मंदिरच होईल, असा निर्णय दिला. मुस्लिम पक्षकार सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येतच अन्यत्र 5 एकर जमीन देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले.

संबंधित बातम्या :

Ayodhya verdict : अयोध्या निकालाबाबत सुप्रीम कोर्टाचे 20 महत्त्वाचे मुद्दे

Amit Shah Ram Mandir

Published On - 3:26 pm, Mon, 16 December 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI