PHOTO : भगवा टी-शर्ट घालून अमित ठाकरे मैदानात, तुफान फटकेबाजी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पूत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray cricket) यांनी नुकतेच राजकारणात एण्ट्री केली.

  • Updated On - 8:08 am, Sun, 9 February 20 Edited By:
1/6
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray cricket) यांनी नुकतेच राजकारणात एण्ट्री केली. अमित ठाकरे यांनी राजकारणात एण्ट्री करताच ते अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. काल (8 फेब्रुवारी) अमित ठाकरे (Amit Thackeray cricket) यांनी क्रिकेट सामने आणि कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन केले.
2/6
क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन केल्यानंतर अमित ठाकरेंनीही बॅटिंग करत तुफान फटके लगावले.
3/6
या कार्यक्रमावेळी अमित ठाकरे यांनी भगव्या रंगाचा टी-शर्ट घातला होता.
4/6
दादर येथे पक्षाचे स्थानिक पदाधिकारी अभिषेक गुप्ता यांनी आयोजित केलेल्या क्रिकेट सामन्यांचे अमित ठाकरे यांनी उद्घाटन केलं.
5/6
क्रिकेटनंतर त्यांनी कबड्डी सामन्यांचेही उद्घाटन केलं आणि खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
6/6
कबड्डी स्पर्धेतील पंचांसोबत अमित ठाकरे