नानावटी रुग्णालयाबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ, अमिताभ बच्चन आणि अभिषेकला डिस्चार्ज मिळण्याची शक्यता

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची प्रकृती उत्तम असून त्यांना आज (22 जुलै)  किंवा उद्या रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे (Amitabh Bachchan and Abhishek likely to be discharged from Nanavati hospital).

नानावटी रुग्णालयाबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ, अमिताभ बच्चन आणि अभिषेकला डिस्चार्ज मिळण्याची शक्यता


मुंबई : बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची प्रकृती उत्तम असून त्यांना आज (22 जुलै)  किंवा उद्या रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नानवटी रुग्णालयाबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, आध्यात्मिक योगगुरु प्रकाश इंडीया टाटा यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना दोघी पितापुत्रांना आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी नक्की डिस्चार्ज मिळेल, अशी माहिती दिली (Amitabh Bachchan and Abhishek likely to be discharged from Nanavati hospital).

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

अमिताभ बच्चन यांची आज संध्याकाळी कोरोना चाचणी केली जाणार आहे. अमिताभ यांच्यासह अभिषेक यांचीदेखील चाचणी केली जाणार आहे. या चाचणीचा अहवाल आल्यानंतर कुठल्याही क्षणी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. अमिताभ यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांचं ऑक्सिजन लेव्हल आणि ब्लड प्रेशर सामान्य आहे, अशी माहिती नानावटी रुग्णालयाचे डॉक्टर अली इरानी यांनी दिली आहे.

अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन या दोघांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती 11 जुलै रोजी रात्री उशिरा समोर आली होती. स्वत: अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली होती. अमिताभ बच्चन आणि अभिषेकला 11 जुलै रोजी रात्रीच नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगी आराध्या बच्चनलाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली.

ऐश्वर्या आणि मुलगी आराध्या या दोघींमध्येही सुरुवातीला कोरोनाची लक्षणं नसल्याने त्यांना घरीच आयसोलेट करण्यात आलं होतं. मात्र, 17 जुलै रोजी या दोघींना श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. नानावटी रुग्णालयात सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत (Amitabh Bachchan and Abhishek likely to be discharged from Nanavati hospital).

अमिताभ बच्चन यांचे ट्विट

“माझा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसेच माझ्या कुटुंबाला आणि घरातील इतर स्टाफच्याही कोरोना चाचण्या झाल्या आहेत. त्यांच्या चाचणीचा रिपोर्ट अद्याप आलेला नाही,” असे ट्विट अमिताभ बच्चन यांनी केले आहे.

“तसेच गेल्या दहा दिवसात माझ्या संपर्कात जे व्यक्ती आले त्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करावी,” असेही बिग बींनी  ट्विटमध्ये म्हटले आहे.

संबंधित बातम्या :

Amitabh Bachchan Corona | अमिताभ बच्चन आणि अभिषेकला कोरोना

ऐश्वर्या आणि आराध्याही नानावटी रुग्णालयात दाखल

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI