‘झुंड’ शूटिंगदरम्यान बिग बींचा नागपुरातील विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला

नागपूर: दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या झुंड या सिनेमाच्या शूटिंगसाठी बिग बी अमिताभ बच्चन सध्या नागपुरात आहेत. ज्या सेंट पॉल शाळेत चित्रीकरण सुरु आहे, त्या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत अमिताभ यांनी संवाद साधला. तुम्ही शिकत असलेल्या शाळेने दिलेली शिस्त पाळा, असा सल्ला अमिताभ यांनी विद्यार्थ्यांना दिला. तसंच या शाळेत आम्हाला कुठलाही त्रास झाला नाही, शाळेची शिस्त चांगली आहे, असं […]

'झुंड' शूटिंगदरम्यान बिग बींचा नागपुरातील विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:43 PM

नागपूर: दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या झुंड या सिनेमाच्या शूटिंगसाठी बिग बी अमिताभ बच्चन सध्या नागपुरात आहेत. ज्या सेंट पॉल शाळेत चित्रीकरण सुरु आहे, त्या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत अमिताभ यांनी संवाद साधला. तुम्ही शिकत असलेल्या शाळेने दिलेली शिस्त पाळा, असा सल्ला अमिताभ यांनी विद्यार्थ्यांना दिला. तसंच या शाळेत आम्हाला कुठलाही त्रास झाला नाही, शाळेची शिस्त चांगली आहे, असं कौतुकही केलं.

तुमचे बालपण बघून मला माझे बालपण आठवले. शाळेचे दिवस मौल्यवान असतात. ते कधीच विसरु शकत नाही. जे शाळेत शिकता, तेच आयुष्यभर शिदोरीप्रमाणे कामी येते. मी शाळेने दिलेली शिकवण आजही अमलात आणतो. शिक्षकांचा आदर करा, भारताचे नाव उज्जल करा, असेही मार्गदर्शन अमिताभ यांनी विध्यार्थ्यांना केले.

नागराजचा झुंड

सैराट सिनेमामुळे घराघरात पोहोचलेला मराठमोळा दिग्दर्शक नागराज मंजुळे झुंड या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहे. नागराजचा बॉलिवूडमधील हा पहिला सिनेमा आहे. बिग बी अमिताभ बच्चन हे एका क्रीडा प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहेत. झोपडीत राहणाऱ्या मुलांना निवृत्त फुटबॉल क्रीडा शिक्षक विजय बारसे भेटतात आणि त्यांचं आयुष्य बदलून टाकतात, अशी या सिनेमाची कथा आहे. सत्यकथेवर आधारित हा सिनेमा आहे.

नागराज मंजुळेने या सिनेमाची स्क्रीप्ट लिहिण्यासाठी सुमारे दोन वर्ष वेळ घेतला. बिग बी अमिताभ बच्चन यांना नजरेसमोर ठेवूनच नागराजने ही स्क्रीप्ट लिहिली.

ज्या विजय बारसेंवर झुंड हा सिनेमा आधारित आहे, त्यांनी अनेक मुलांचं आयुष्य बदलून टाकलं. विजय बारसे एका कॉलेजमध्ये क्रीडा प्रशिक्षक होते. निवृत्तीनंतर त्यांनी झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉलचं प्रशिक्षण दिलं.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.