ऐश्वर्यावरील विवेक ओबेरॉयच्या ट्वीटवर अमिताभ बच्चन म्हणतात…

मुंबई : अभिनेता विवेक ओबेरॉयने (Vivek Oberoi) सलमान खान (Salman Khan), ऐश्वर्या राय (Aishwarya Rai Bachchan) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) या बॉलिवूड स्टार्सविषयी मीम सोशल मीडियावर टाकले. त्यानंतर विवेक ओबेरॉय चांगलाच ट्रोल झाला. अनेकांनी विवेकला खडेबोल सुनावले. आता बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील याविषयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. अमिताभ बच्चन यांनी विवेक ओबेरॉयला […]

ऐश्वर्यावरील विवेक ओबेरॉयच्या ट्वीटवर अमिताभ बच्चन म्हणतात...
Follow us
| Updated on: May 21, 2019 | 7:30 PM

मुंबई : अभिनेता विवेक ओबेरॉयने (Vivek Oberoi) सलमान खान (Salman Khan), ऐश्वर्या राय (Aishwarya Rai Bachchan) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) या बॉलिवूड स्टार्सविषयी मीम सोशल मीडियावर टाकले. त्यानंतर विवेक ओबेरॉय चांगलाच ट्रोल झाला. अनेकांनी विवेकला खडेबोल सुनावले. आता बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील याविषयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अमिताभ बच्चन यांनी विवेक ओबेरॉयला सोशल मीडियावर व्यक्त होताना काळजी घेण्याचा अप्रत्यक्षपणे सल्ला दिला आहे. अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर एक काव्यात्मक ट्वीट केले. ते म्हणाले, “माझ्या मित्रा सोशल मीडियावर विचारपूर्वक व्यक्त हो. यातून सामाजिक बांधिलकी संपायला नको.”

विवेक ओबेरॉयने सोमवारी ऐश्वर्या राय बच्चनविषयी आक्षेपार्ह ट्वीट केले होते. त्यावर अनेक स्तरातून टीकेची झोड उठली होती. वाद वाढण्याची चिन्हे दिसल्यानंतर महिला आयोगाने देखील विवेक ओबेरॉयला नोटीस बजावली होती. अखेर विवेक ओबेरॉयने याप्रकरणी माफी मागितली आणि संबंधित ट्वीटही डिलीट केले. मात्र, माफी येऊपर्यंत हे प्रकरण खूपच वाढले आहे.

बॉलिवूडमधील अनेक मोठे चेहरे विवेकविरोधात मैदानात उतरले. त्यांनी या ट्वीटवर सडकून टीका केली आणि आपली नाराजी सार्वजनिकपणे व्यक्त केली. यात सोनम कपूर, क्रिती खरबंडा, उर्मिला मातोंडकर सारख्या अनेकांचा समावेश आहे. आता अमिताभ बच्चन यांनीही विवेकला अप्रत्यक्षपणे  सल्ला दिल्यानंतर तरी विवेकला याची जाण होईल, अशी अपेक्षा व्यक्त  केली जात आहे. अमिताभ बच्चन आणि विवेक ओबेरॉयने ‘शूटआउट अॅट लोखंडवाला’ या चित्रपटात सोबत काम केले होते.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.