आर्चीच्या ‘मेक अप’ची महानायकाकडून दखल, सलमानकडूनही कौतुक!

आर्चीच्या 'मेक अप'ची महानायकाकडून दखल, सलमानकडूनही कौतुक!

बॉलिवुडचा दबंग स्टार सलमान खानने आर्चीच्या मेकअपचे कौतुक केलं आहे.

Namrata Patil

|

Jan 06, 2020 | 8:16 PM

मुंबई : अभिनेत्री रिंकू राजगुरु (Rinku Rajguru) पुन्हा एकदा प्रचंड चर्चेत आली आहे. विशेष म्हणजे बॉलिवुडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी रिंकू राजगुरुचे कौतुक केले आहे. यासोबतच बॉलिवुडचा दबंग स्टार सलमान खानने देखील आर्चीच्या ‘मेकअप’चे कौतुक केले आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या नजरा पुन्हा एकदा रिंकू राजगुरुवर खिळल्या आहेत (Rinku Rajguru) .

रिंकूचा ‘मेकअप’ हा नवा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. हा ट्रेलर बघितल्यावर मोठमोठ्या लोकांनी रिंकुचं कौतुक केलं आहे. त्याच अमिताभ बच्चन आणि सलमान खान सारख्या मोठ्या अभिनेत्यांचा समावेश आहे.

रिंकूच्या नव्या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये रिंकू एकदम बिंधास आणि स्वतंत्र अशी मुलगी दाखवली आहे. हा चित्रपट विनोदी असणार आहे. याशिवाय काहीतरी गंभीर आणि खोल असा भावनिक संदेश हा चित्रपट देणार, अशी शक्यता चाहत्यांकडून वर्तवली जात आहे. या चित्रपटाचा ट्रेलर बघितल्यानंतर रिंकुच्या चाहत्यांची चित्रपटाबाबतची उत्कंठा वाढली आहे.

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ हा रिंकू राजगुरुचा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट 2016 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात रिंकूने ‘आर्ची’ नावाची भूमिका साकारली होती. ही भूमिका प्रेषकांना प्रचंड भावली. रिंकुला तर आजही लोक ‘आर्ची’ याच नावाने ओळखतात.

सैराट चित्रपटानंतर रिंकुने एका तमिळ चित्रपटात काम केले. त्यानंतर तिचा ‘कागर’ हा मराठी चित्रपट आला. रिंकूच्या या चित्रपटालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता रिंकू आता पुन्हा एका नव्या भूमिकेत येत आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें