Amruta Rao | अमृता रावच्या मुलाचे नामकरण, चाहत्यांनाही नाव सुचवण्याची सुवर्णसंधी!

बॉलिवूड अभिनेत्री अमृता राव आई झाली आहे. नुकताच तिने एका गोड मुलाला जन्म दिला आहे. रविवारी सकाळी अमृताच्या आयुष्यात या चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाली आहे.

Amruta Rao | अमृता रावच्या मुलाचे नामकरण, चाहत्यांनाही नाव सुचवण्याची सुवर्णसंधी!
Follow us
| Updated on: Nov 03, 2020 | 8:39 PM

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री अमृता राव आई झाली आहे. नुकताच तिने एका गोड मुलाला जन्म दिला आहे. रविवारी सकाळी अमृताच्या आयुष्यात या चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाली आहे. ज्याप्रमाणे अमृता राव गरोदर असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. त्याचप्रमाणे तिला मुलगा झाल्याचीही बातमी वेगाने सर्वत्र पसरली. अमृताचा पती, आरजे अनमोलने चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. तसेच, आमच्या गोड बाळासाठी नाव सुचवा, असेही आरजे अनमोलने चाहत्यांना सांगितले आहे. (Amruta Rao and Rj anmol ask baby name to fans)

View this post on Instagram

A post shared by AMRITA RAO?? (@amrita_rao_insta) on

आरजे अनमोलने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये लिहिले आहे की, ‘मुलगा झाला आहे. अमृता आणि बाळ दोघेही ठीक आहेत. तुमच्याकडून मिळालेल्या प्रेमामुळे आम्ही स्वतःला भाग्यवान मानतो…धन्यवाद! आमच्या नात्याला 11 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने यापेक्षा चांगली दुसरी कोणतीही भेट नसू शकते.’ आरजे अनमोलने चाहत्यांना मुलाचे नाव सुचवायला सांगितल्यानंतर इन्स्टा कमेंट बॉक्सवर चाहत्यांनी नावांचा पाऊसच पाडला आहे. त्यामध्ये काही चाहत्यांनी अमन, अमोल, अमरीश, अमरेंद्र, आयुष, रायन, पुष्यमित्र, अमूल्य, तक्षित, अनित यासह बरीच नावे सुचवली आहेत. आरजे अनमोलची बहीण अंकिता सूदने देखील अमृता आई झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. तिने पोस्ट करत लिहले की, ‘आत्या सुपर सुपर हैप्पी आहे. हा आमचा रॉकस्टार… याच्या येण्याने आम्हाला आनंद झाला आहे. अमृताने स्वतः एक फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना आपण गर्भवती असल्याची आनंदाची बातमी दिली होती. अमृताने गर्भवती असल्याची बातमी चाहत्यांना अगदी 9व्या महिन्यात दिली होती. तोपर्यंत अमृताने ही बातमी लपवली होती, मात्र अखेर व्हायरल झालेल्या फोटोनंतर तिने स्वतःच याचा खुलासा केला होता. अमृताने आपला पती आरजे अनमोलसोबत एक फोटो शेअर केला होता. यात तिने म्हटलं होतं की, ‘तुमच्यासाठी हा 10 वा महिना आहे, पण आमच्यासाठी हा 9 वा महिना आहे. सरप्राईज, सरप्राईज, सरप्राईज… अनमोल आणि मी आमच्या नवव्या महिन्यात आहोत.’ आपली एक्साईटमेंट सांगताना अमृताने सांगितलं होतं, ‘हो गुडन्यूज माझ्या चाहत्यांना आणि मित्रांना सांगताना मी खूप एक्सायटेड आहे. इतके दिवस ही बातमी पोटात लपवून ठेवण्यासाठी सॉरी, पण हे खरं आहे. लवकरच बाळ येणार आहे’. असं तिने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं. प्रेग्नंसीप्रमाणेच अमृताने आपलं लग्न देखील असंच सिक्रेट ठेवलं होतं. तिने 2016 मध्ये आरजे अनमोलसोबत अगदी मोजक्या जवळच्या लोकांच्या उपस्थितीत लग्न केलं होतं. लग्नाआधी दोघांनी एकमेकांना जवळपास 7 वर्षे डेट केलं होतं. अमृताने 2002 मध्ये ‘अब के बरस’ या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. हा चित्रपट हिट झाला नाही, मात्र अमृताने आपल्या अभिनयातून सर्वांची मनं जिंकली.

संबंधित बातम्या :

Photo : गुड न्यूज! अमृता रावच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन…

Kangana Ranaut | चौकशी होणारच! कंगना रनौतसह बहिण रंगोली चंदेलला वांद्रे पोलिसांची नोटीस

(Amruta Rao and Rj anmol ask baby name to fans)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.