अनिल देशमुख आणि एकनाथ खडसेंची भेट; भाजप-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची गर्दी

शासकीय विश्रामगृहाबाहेर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. | Anil Deshmukh will meet Eknath Khadse

अनिल देशमुख आणि एकनाथ खडसेंची भेट; भाजप-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची गर्दी
Follow us
| Updated on: Oct 17, 2020 | 4:48 PM

जळगाव: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि राज्याचे गृहमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची आज भेट झाली. रावेरच्या शासकीय विश्रामगृहात ही भेट पार पडली. त्यावेळी शासकीय विश्रामगृहाबाहेर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती.  आता देशमुख आणि खडसे भेटीतून काही नवे  घडणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (Anil Deshmukh will meet Eknath Khadse)

शासकीय विश्रामगृहातून हे दोन्ही नेते रावेर हत्याप्रकरणातील पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी रवाना झाले. काही दिवसांपूर्वी घडलेल्या रावेर हत्याप्रकरणात आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे. सध्या हे प्रकरण चांगलेच गाजत आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख जातीने रावेरमध्ये आले आहेत.

एकनाथ खडसे आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, तुर्तास खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा हा मुहूर्त चुकला आहे. एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधानपरिषदेवर पाठवणार ते खडसे यांना महाविकासआघाडी सरकारमध्ये कृषिमंत्रीपद मिळणार, अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र, तुर्तात खडसे यांनी राष्ट्रवादी प्रवेशावर काहीही भाष्य न करायचे ठरवल्याने या सर्व चर्चा फोल ठरल्या आहेत. परंतु, दुसरीकडे खडसे यांनीच ‘योग्य वेळ येईल , वाट बघा, असे सांगून राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेला अजूनही वाव ठेवला आहे.

माझ्या राष्ट्रवादी प्रवेशाचे सारे मुहूर्त तुमचेच : एकनाथ खडसे एकनाथ खडसे 17 ऑक्टोबरला राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. मात्र, प्रत्यक्षात तसे काहीच घडले नाही. या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी शनिवारी दुपारी जळगावात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “राष्ट्रवादी प्रवेशाबाबत मला काहीच बोलायचे नाही, नो कमेंट्स” असे उत्तर देत या विषयाचे खंडन केले. “माझ्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबतचे सारे मुहूर्त तुमचेच आहेत”, असे खडसे म्हणाले.

पत्रकारांनी खडसेंना त्यांच्या संभाव्य राष्ट्रवादी प्रवेशाबाबत विचारणा केली असता ते म्हणाले की, “या विषयाबाबत मला कोणतीही चर्चा करायची नाही”. मी राष्ट्रवादीत जाणार म्हणून जे मुहूर्त सांगितले जात आहेत, ते सारे मुहूर्त तुम्हीच म्हणजेच माध्यमांनी ठरवले आहेत, असे सांगत त्यांनी राष्ट्रवादी प्रवेशाचे खंडन केले.

संबंधित बातम्या:

पक्षांतराचा मुहूर्त टळला, एकनाथ खडसेंसह राष्ट्रवादीच्या नेत्यांची चुप्पी

माझ्या राष्ट्रवादी प्रवेशाचे सारे मुहूर्त तुमचेच : एकनाथ खडसे

(Anil Deshmukh will meet Eknath Khadse)

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.