अण्णांच्या मौन व्रताचा पाचवा दिवस, टीव्ही 9 च्या प्रश्नांना अण्णांची लेखणीतून उत्तरं!

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मौन आंदोलनाचा (Anna Hazare maun vrat) आज पाचवा दिवस आहे. मात्र अद्यापही सरकारकडून कोणतीही हालचाल दिसत नाही.

अण्णांच्या मौन व्रताचा पाचवा दिवस, टीव्ही 9 च्या प्रश्नांना अण्णांची लेखणीतून उत्तरं!

अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मौन आंदोलनाचा (Anna Hazare maun vrat) आज पाचवा दिवस आहे. मात्र अद्यापही सरकारकडून कोणतीही हालचाल दिसत नाही. याच प्रश्नावर अण्णांशी लेखणीतून (Anna Hazare maun vrat) संवाद साधला असता अण्णा म्हणाले की, सरकारकडे माझे काही मागणे नाही. महिलांना न्याय मिळावा म्हणून मी आत्मक्लेश करून घेणे एवढाच उद्देश आहे. महिलांवरील वाढत्या अत्याचारामुळे अण्णा हजारे यांनी मौनव्रत आंदोलन सुरू केलं आहे. मौनव्रत आंदोलनादरम्यान अण्णा हजारे यांनी लिखित स्वरुपात टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला.

अण्णा हजारेंचं पत्र

“माझं आंदोलन कोणत्याही व्यक्ती, पार्टी किंवा सरकारविरोधात नाही. महिलांवरील वाढत्या अत्याचारामुळे मी व्यथित झालो आहे म्हणून मौनव्रत धारण केलं आहे. महिलांवरील अत्याचाराबरोबर महिलांना मारलं जात आहे. उन्नाव आणि हैदराबादमध्ये अत्याचारानंतर महिलांना मारून टाकलं हे पशूला लाजवणारं कृत्य आहे. निर्भयाप्रकरणात आरोपीला 6 वर्षांपूर्वी फाशी सुनावली पण अजूनही फाशी दिली नाही. एन्काऊंटर हे घटनाबाह्य आहे. पण लोक त्याचं स्वागत करतात कारण न्याय मिळायला उशीर होतो. देशात न्यायाधीशांची संख्या कमी आहे ती तातडीने भरण्यात यावी. महिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी प्रत्येक घरात लहानपणापासून संस्कार घालणे गरजेचे आहे मुलांना कसे वागावे याचेही शिक्षण दिले जावे” अशी मागणी अण्णा हजारे यांनी केली.

मौनव्रत आंदोलनादरम्यान अण्णा हजारे यांनी लिखित स्वरूपात टीव्ही 9 मराठीशी संवाद साधून आपलं म्हणणं मांडलं.

गावकऱ्यांचा इशारा 

अण्णा हजारे यांच्या मौन आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. मात्र अद्यापही सरकारकडून कोणतीही हालचाल दिसत नाही. गेल्या चार दिवसांपासून सरकारी पातळीवरवरून कोणताही संपर्क झाला नसल्याने, आंदोलनात तोडगा निघाला नसल्याचे अण्णांनी म्हटलं आहे. तर आंदोलन अधिक तीव्र करणार का असा प्रश्न विचारला असता त्यांनी लिहलं  की, माझ्यासारखे अनेक लोक वेगवेगळी आंदोलने करीत आहेत. निर्भयाप्रकरणात निर्भयाला न्याय निश्चित मिळेल याचा मला विश्वास आहे. मात्र अधिक वेळ लागू नये याबाबतची चिंता अण्णांनी व्यक्त केली. तसेच सरकारने तोडगा काढला नाही तर गावकऱ्यांनी देखील आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Published On - 11:40 am, Tue, 24 December 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI