17 लाख सैनिकांना पदकांचं वाटपच नाही, सैनिकांनी 250 रुपयांची मेडल विकत घेऊन खांद्याला लावली

एका सैनिकाच्या छातीवर मेडल म्हणजे त्याच्यासाठी अभिमानाची गोष्ट असते. तसेच त्याग आणि बलिदानाचे ते प्रतीक असते. पण आतापर्यंत अनेक सैनिकांनी चक्क बनावट पदकं (Army 17 lakh medal in waiting list) आपल्या छातीवर लावली आहेत.

17 लाख सैनिकांना पदकांचं वाटपच नाही, सैनिकांनी 250 रुपयांची मेडल विकत घेऊन खांद्याला लावली

नवी दिल्ली : एका सैनिकाच्या छातीवर पदक म्हणजे त्याच्यासाठी अभिमानाची गोष्ट असते. तसेच त्याग आणि बलिदानाचे ते प्रतीक असते. पण आतापर्यंत अनेक सैनिकांनी चक्क बनावट पदकं (Army 17 lakh medal in waiting list) आपल्या छातीवर लावली आहेत. 31 जुलै 2019 पर्यंत सैनिकांचे 17.33 लाख सेवा पदक प्रतीक्षेच्या यादीत आहेत, अशी माहिती माहिती अधिकारातून (RTI) समोर (Army 17 lakh medal in waiting list) आली आहे.

सेवानिवृत्त कर्नल दर्शन सिंह ढिल्लोन यांनी यावर्षी एप्रिल महिन्यात संरक्षण मंत्रालयात माहिती अधिकार दाखल केला होता. यानंतर त्यांना या माहिती अधिकारातून धक्कादायक अशी माहिती मिळाली. 31 जुलै 2019 पर्यंत सैनिकांचे 17.33 लाख सेवा पदकं प्रतीक्षेच्या यादीत आहेत. अजूनही ही पदकं कुणाला मिळालेली नाहीत.

“मी सेवेत असताना बाजारातील नकली पदकं छातीवर लावून दिवस काढले. दिल्लीतील एका बाजारातून 250 रुपयात मला पदकं खरेदी करावी लागली होती, असं दर्शन सिंह यांनी सांगितले. दरम्यान, आरोग्याच्या कारणामुळे सिंह यांनी वेळेपूर्वी निवृत्ती घेतली. पण आज 13 वर्षानंतरही ते आपल्या पदकाची वाट पाहत आहेत.

“मी जम्मू काश्मीरमध्ये आठ वर्ष काम केले आहे. मला 9 पदकांनी सन्मानित केले होते. पण एकच खरे पदक दिले. तसेच मला बाजारातून बनावट पदकं खरेदी करण्यापलीकडे पर्याय नव्हता”, असं पंचकुला येथे राहणारे 54 वर्षीय सेवानिवृत्त कर्नल नागिंदर सिंह यांनी सांगितले.

दरम्यान, कर्नल दर्शन सिंह ढिल्लोने सरंक्षण मंत्रालय आणि डायरेक्टोरेट ऑफ मिलिट्री रेगुलेशन आणि फॉर्म्समध्ये माहिती अधिाकर दाखल केला होता. मिनिस्ट्री ऑफ डिफेंसने पदकांसाठी 2014, 2015, 2016 मध्ये 20 कोटी रुपये जाहीर केले होते, असं डायरेक्टोरेट ऑफ मिलिट्री रेग्युलेशन आणि फॉर्मसने माहिती अधिकाराखाली कर्नल सिंह यांना उत्तर दिले.

“सैन्याने पदक देण्यासाठी जबाबदारी घेतली असून एका पदक बनवणाऱ्या कंपनीसोबत कॉन्ट्रॅक्ट प्रक्रियाही सुरु आहे. वर्तमानात कॉन्ट्रॅक्ट प्रक्रिया पूर्ण होईल. कॉन्ट्रॅक्टवर सही दिल्यानंतर अधिक माहिती दिली जाईल. पण कंपनीची नावं सांगितली जाणार नाही”, असं सैन्याचे प्रवक्ते कर्नल अमन आनंद यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Published On - 9:30 am, Tue, 24 December 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI