संभाजी भिडे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी

शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या विरोधात बेळगावमध्ये अटक वॉरंट जारी (Arrest Warrent against Sambhaji Bhide) करण्यात आला आहे.

संभाजी भिडे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी

कोल्हापूर : शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या विरोधात बेळगावमध्ये अटक वॉरंट जारी (Arrest Warrent against Sambhaji Bhide) करण्यात आला आहे. गेल्यावर्षी 13 एप्रिल 2018 रोजी भिडे यांनी आचारसंहितेचा भंग केल्यामुळे त्यांच्यावर बेळगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आतापर्यंत सगळ्या सुनावणीला भिडे गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी (Arrest Warrent against Sambhaji Bhide) करण्यात आला आहे.

गेल्यावर्षी बेळगाव येथील येळ्ळूर गावात महाराष्ट्र मैदानावर कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला संभीजी भिडे यांना निमंत्रित करण्यात आलेले. त्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावून तेथील उपस्थितांना मार्गदर्शन केले.

विशेष म्हणजे या कार्यक्रमामध्ये त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना निवडून द्या, असं विधान केले होते. या विधानामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.

या संदर्भातील पुढील सुनावणी ही 24 मार्च रोजी होणार आहे. यापूर्वीही संभाजी भिडे यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. तसेच, भीमा-कोरेगावर प्रकरणातही त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI