एशियन, कॉमनवेल्थ गेम्समध्ये गोल्ड मेडल, धावपटू कविता राऊत राज्यपालांच्या भेटीला, शासकीय नोकरीत नियुक्तीची मागणी

आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत हिने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन क्लास 1 च्या पदासाठी नियुक्ती व्हावी, अशी मागणी केलीय. Kavita Raut Bhagatsingh Koshyari

एशियन, कॉमनवेल्थ गेम्समध्ये गोल्ड मेडल, धावपटू कविता राऊत राज्यपालांच्या भेटीला, शासकीय नोकरीत नियुक्तीची मागणी
Follow us
| Updated on: Nov 30, 2020 | 2:16 PM

नाशिक: आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करुन महाराष्ट्रासह नाशिकचं नाव उंचावणाऱ्या धावपटू कविता राऊत यांना शासकीय नोकरीसाठी वणवण फिरावं लागत आहे. नाशिकची आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन क्लास 1 च्या पदासाठी नियुक्ती व्हावी, अशी मागणी केली आहे. 2014 पासून पाठपुरावा करून देखील डावलल जात असल्याने शैक्षणिक असली तरी माझी सामाजिक पात्रता नसल्याने, असा दुजाभाव होत असल्याची उद्विग्न प्रतिक्रिया कविता राऊत हिने व्यक्त केली आहे. (Athlete Kavita Raut meet Governor Bhagatsingh Koshyari for demand of appointment in Govt. job)

2018 मध्ये खेळांडूमधून काही जणांची नावं घेण्यात आली त्यातूनही डावलण्यात आल्याची भावना कविता राऊत यांनी व्यक्त केली. यापूर्वी शालेय व शैक्षणिक विभागाच्या सचिवांना भेटायला गेले होते. त्यावेळी सकाळी 10 ते 6 वाजेपर्यंत थांबवण्यात आले होते. त्यानंतर तुमचे काम होईल तुम्ही घरी जावा, असे सांगण्यात आले पण काम झाले नाही, अशी प्रतिक्रिया कविता राऊत यांनी दिली.

ऑलम्पिक पार्टीसिपेंट , एशियन गेम्स डबल मेडल , कॉमन वेल्थ गेम्स मेडल, साऊथ एशियन गेम्स गोल्ड मेडल, नेशनल गेम्स रेकॉर्ड होल्डर , अर्जुन पुरस्कार आशा एक ना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेल्या आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत हिने प्रथम दर्जाच्या नियुक्ती साठी थेट राज्यपालांची भेट घेतली आहे. शासन आदेश असताना 2014 पासून प्रथम दर्जाच्या नियुक्तीबाबत टोलवाटोलवी सुरू असल्याचा आरोप कविताने केला आहे.आधी शैक्षणिक पात्रता नसल्याचा आक्षेप घेण्यात आला, मात्र नंतर शैक्षणिक पात्रता पूर्ण करून देखील डावलला जात असल्याने मला शैक्षणिक नाही तर सामाजिक पात्रतेमुळे डावलला जात असल्याचा आरोप कविताने केला आहे. (Athlete Kavita Raut meet Governor Bhagatsingh Koshyari for demand of appointment in Govt. job)

कॉमनवेल्थमध्ये देशाचं प्रतिनिधीत्व करणाऱ्यांना डावलल्याचा आरोप?

कविता राऊत यांच्या मागून आलेल्या ज्युनियर खेळाडूंना देखील प्रथम दर्जाच्या नियुक्तया मिळाल्या.एवढंच काय तर हिंद केसरी उपविजेत्याला जर हे नियुक्ती मिळत असेत तर कॉमन वेल्थ आणि एशियन गेम्स च्या खेळाडूंना फक्त त्यांच्या सामाजिक पात्रतेमुळे डावलल जातंय का?, असा सवाल कविता राऊतांचे पती महेश तुंगार यांनी उपस्थित केला आहे

धावपटू कविता राऊत यांनी ऐन गरोदरपणात देखील मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवल्या.मात्र, इथल्या अधिकाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक मिळाल्यानंतर मंत्रायलयाचा नादच सोडून दिला , असं कविता आणि तिच्या पतीने सांगितलंय.मात्र, नाशिकचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचजवणाऱ्या कविताला न्याय मिळणार का हा खरा प्रश्न आहे.

संबंधित बातम्या :

राज ठाकरे मैदानात, राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या भेटीची वेळ ठरली

मॅरेथॉनसाठी मुंबई पोलीस सज्ज, 70 रस्ते बंद, 28 रस्त्यांवर नो पार्किंग

(Athlete Kavita Raut meet Governor Bhagatsingh Koshyari for demand of appointment in Govt. job)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.