अहमदनगरमध्ये शिवसैनिकावर प्राणघातक हल्ला

अहमदनगरमध्ये शिवसैनिकावर प्राणघातक हल्ला

अहमदनगर : अहमदनगरमध्ये सागर थोरात या शिवसैनिकावर प्राणघात हल्ल्याची घटना घडली आहे. अहमदनगरमध्ये उद्या महापालिकेसाठी मतदान आहे. त्यामुळे ऐन मतदानाच्या तोंडावर हल्ल्याची घटना घडल्याने शहरात तणाव निर्माण झाला आहे. हल्ल्यात सागर थोरात जखमी झाला असून, त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. जखमी शिवसैनिकाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सागर थोरातवर प्राणघातक हल्ला कुणी केला, हे कळू शकलेलं नाही. शिवाय, हल्ल्यामागचं कारणही अद्याप स्पष्ट नाही. मात्र, महापालिका मतदानाच्या तोंडावर हल्ला झाल्याने, राजकीय हेतून हल्ला झाल्याचा अंदाज वर्तवला जातो आहे.

सागर थोरातवर भाजप नगरसेवक सुवेंद्र गांधींच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा सेनेचा आरोप आहे. सुवेंद्र भाजप खासदार दिलीप गांधी यांचे पुत्र आहेत.

“खासदार गांधींचे कार्यकर्ते पैसे वाटत असून त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही. मात्र शिवसैनिकांवर गुन्हा दाखल केला जातोय. भाजप पैशाचं राजकारण करत आहेत.”, असा आरोप सेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनी केला आहे.

दरम्यान, शिवसैनिकावर हल्ला झाल्यानंतर भाजप खासदार दिलीप गांधी पोलिस, पुत्र सुवेंद्र गांधी कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. तसेच, शिवसेनेचे उपनेते आणि माजी आमदार अनिल राठोड, संपर्क प्रमुख भाऊ कोरेगावकरही पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI