उंट पाणी जास्त पितात म्हणून ऑस्ट्रेलियात 10 हजार उंटांना गोळ्या घालणार

ऑस्ट्रेलियामध्ये तब्बल 10 हजार उंटांना मारण्याचा फर्मान काढण्यात आला आहे. हे उंट पाणी जास्त पितात म्हणून या उंटांना ठार केलं जाणार आहे.

उंट पाणी जास्त पितात म्हणून ऑस्ट्रेलियात 10 हजार उंटांना गोळ्या घालणार

कॅनबेरा : ऑस्ट्रेलियामध्ये तब्बल 10 हजार उंटांना मारण्याचा फर्मान काढण्यात आला आहे. हे उंट पाणी जास्त पितात म्हणून या उंटांना ठार केलं जाणार आहे. माहितीनुसार, ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण-पश्चिममधील अनांगु पितजनजातजारा याकुनीजतजारा (Anangu Pitjantjatjara Yankunytjatjara- APY) येथे या उंटांना बुधवारी (8 जानेवारी) म्हणजेच आज ठार केलं जाणार आहे. उंटांच्या लोकसंख्येत अतिशय वेगाने वाढ होत असल्याने आणि सध्या देशात पाण्याची कमतरता असल्याने, हे गरजेच आहे. हे उंट खूप पाणी पितात, असं स्पष्टीकरण साऊथ ऑस्ट्रेलियन डिपार्टमेंट फॉर एनवायरमेंट अँड वॉटरच्या (DWE) दिलं.

जिथे-जिथे पाणी, तिथे-तिथे उंट

DEW नुसार, हे उंट जिथेही पाणी दिसेल तिथे पोहोचून जातात. मग तो कुठला नळ असो, पाण्याची टाकी असो किंवा तलाव असो. APY लँड्सचे मॅनेजर रिचर्ड किंग्सने सांगितलं, हे उंट अचानकपणे आमच्या लोकांमध्ये घुसतात. त्यामुळे चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण होते. लहान मुलं, महिलांना यांच्यापासून धोका असतो. हे उंट लहान लहान गटात संपूर्ण वाळवंटात फिरत असतात.

5 किलोमीटर अंतरावरुन पाण्याचा स्त्रोत ओळखून घेतात

DEW नुसार हे फेरल उंट आहेत जे पाच किलोमीटरच्या अंतरावरुन पाण्याच्या स्त्रोताला गंधाद्वारे शोधून घेऊन घेतात. अनेकदा पाण्याच्या मोठ्या स्त्रोतांमध्ये हे उंट मरुन सडून जातात, त्यामुळे पिण्याचं पाणी प्रदुषित होते.

हेलिकॉप्टरमधून उंटांची शिकार होणार

DEW ने दिलेल्या माहितीनुसार, या उंटांना ठार करण्यासाठी प्रशिक्षित शूटर्सला बोलवण्यात येणार आहे. हे शूटर्स हेलिकॉप्टरवर बसून हवेतून उंटांवर निशाणा लावतील आणि त्यांना ठार करतील. उंटांना ठार करण्याची ही प्रक्रिया एक आठवड्यापर्यंत चालेल. यानंतर APY लँड्समध्ये राहणारे लोक या उंटांच्या मृतदेहांना दोन आठवड्यांपर्यंत जाळतील.

आमच्या खाण्या-पिण्यासाठी आणि संसाधनांसाठी उंट नुकसानदायक : APY

APY लँड्सचे मॅनेजर रिचर्ड किंग्सने सांगितलं, हे उंट फक्त पाण्याचेच स्त्रोत खराब करत नाही तर आमचं जेवण आणि इतर संसाधनांचंही नुकसान करतात. त्यामुळे हे उंट कन्यापी समाजाच्या लोकांसाठी धोकादायक ठरत आहेत.

उंट झाडाझुडुपांनाही नष्ट करत आहेत : APY

APY लँड्समध्ये काही अतिशय प्राचीन अशा झाडा-झुडुपांच्या प्रजाती आहेत. मात्र, या प्रजाती उंटांचा चारा बनतात. जर या उंटांना थांबवलं नाही तर या प्रजातीही नष्ट होतील.

ऑस्ट्रेलियात 10 लाख फेरल उंट

नॅशनल फेरल कॅमल मॅनेजनमेंट प्लानने 2010 मध्ये भविष्यवाणी केली होती की, जर योग्य व्यवस्थापन केलं नाही तर येत्या दशकात संपूर्ण देशात या उंटांची संख्या 10 लाख होऊन जाईल. त्यामुळे आता यांच्या वाढत्या लोकसंख्येला रोखण्याची वेळ आली आहे, असं DEW ने सांगितलं.

10,000 Camels Will Be Killed In Australia

 

Published On - 1:03 pm, Wed, 8 January 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI